काचुरवाही : शिक्षकांची प्रतीक्षा करून वैतागलेले धान्य घेण्यासाठी आलेले चिमुकले.  
नागपूर

काय हे ! धान्य घेण्यासाठी बोलावले म्हणून विद्यार्थी गेले, अन्‌ पुढे काय झाले, वाचा...

सकाळ वृत्तसेवा

काचुरवाही (जि.नागपूर) : सोमवारी सकाळी10 वाजताची वेळ. रामटेक पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद काचुरवाही शाळेच्या शिक्षकाने पोषण आहाराचे धान्य वाटप होणार म्हणून विद्यार्थ्यांना धान्य घेण्यासाठी शाळेत बोलावले. मुले मोठ्या आशेने ठीक दहा वाजता शाळेत पोचली. परंतु, शिक्षकच शाळेत पोहोचले नसल्याने मुलांना उशिरापर्यंत ताटकळत थांबावे लागले.

शिक्षिकाच होत्या गायब
सकाळी दहा वाजता धान्य घेण्यासाठी काचुरवाहीच्या शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांना आदल्या दिवशी बोलावून घेतले. पण, दीड दोन तास ताटकळल्यानंतर वाढत्या उन्हात मुले अक्षरशः वैतागली. काही विद्यार्थ्यांसोबत आलेल्या पालकांनी शाळेतील खिचडी बनविणाऱ्या काकूंना शिक्षक व धान्य वाटपाविषयी विचारले. शिक्षिका कधीपर्यंत येतील माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. मुलांनी बरीच वाट पाहिली. शिक्षिका आल्या नाहीत. सूर्य डोक्‍यावर येत होता. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर मुले वैतागली. पोटात कावळे ओरडू लागले. लॉकडाउनच्या काळात घरात धान्य नसल्यामुळे आईवडिलांनी मोठ्या आशेने मुलांना शाळेत पाठविले होते. शेवटी खिचडी बनविणाऱ्या काकूंनीच विद्यार्थ्यांना धान्य वाटप केले. यावेळी मुलांना दीड किलो तांदूळ आणि 40 ग्रॅम वाटणे देण्यात आले असून 40 ग्रॅम डाळीऐवजी ग्लासभर डाळ विद्यार्थ्यांना देण्यात आली.


शिक्षक गांभीर्याने वागत नाहीत
एकीकडे संपूर्ण देशभर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असल्याने संपूर्ण देशभर संचारबंदी कायदा 144 लागू करण्यात आला. सर्व शाळा महाविद्यालये आणि कारखाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी बंद ठेवले. ग्रामीण भागात खायचे वांधे होत आहेत. अशावेळी शिक्षकच गांभीर्याने वागत नसतील तर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी काय करावे, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. अशा निष्काळजी करणाऱ्या बेजबाबदार शिक्षकावर ताबडतोब कार्यवाही करावी, अशी पालकांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : चार महामार्गांचे लवकरच भूमिपूजन; नितीन गडकरी यांची माहिती

Kolhapur Amababi Temple : पायाला बसणार नाहीत आता चटके; मंदिर परिसर, दर्शन रांग मार्गावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू

Latest Marathi News Live Update : टेंडर वादातून नगरसेवकाला पिस्तुलाचा धाक; जीवे मारण्याची धमकी, राहात्यात खळबळ

Mumbai demolition incident: बापरे! मुंबईत मोठी दुर्घटना टळली, नाहीतर... स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, काय घडलं?

Pension Scheme: NPS पेंशन योजनेतून पैसे काढताना या चुका करू नका; जाणून घ्या पैसे काढण्याचे सर्व नियम

SCROLL FOR NEXT