Came as a guest and Threatened defamation to girl 
नागपूर

पाहुणा म्हणून आलेल्या आतेभावाने केला बलात्कार...

अनिल कांबळे

नागपूर : राजस्थानमध्ये राहणारा विवाहित युवक पाहुणा म्हणून नागपुरात आला. आठ दिवस मुक्‍कामी थांबला. मात्र, या आठ दिवसांत नातेवाईकाच्या बारावीत शिकणाऱ्या मुलीवर सलग आठ दिवस बलात्कार केला. कुणालाही सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी दिली आणि निघून गेला. हा सर्व प्रकार रात्रीच्या सुमारास घरात आई-वडिलांसह सर्व जण झोपी गेल्यानंतर घडला. मुलीने मैत्रिणीला आपबिती सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. शिवा रमेशचंद्र शर्मा (वय 27, रा. जयपूर-राजस्थान) असे बलात्कार करणाऱ्या नातेवाईक युवकाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 17 वर्षीय निशा (बदललेले नाव) बारावीची विद्यार्थिनी आहे. तिचे वडील खासगी कंपनीत नोकरीला आहेत. आई व भावासह तहसील परिसरात राहते. तिची आत्या राजस्थानमधील जयपूरमध्ये राहते. तिचा मोठा मुलगा शिवा शर्मा विवाहित असून, त्याला दोन मुले आहेत. तो जयपूरला शासकीय नोकरीत आहे. तो पाहुणा म्हणून 21 जून 2020 नागपुरात आला होता. निशाच्या घरी मुक्‍कामी थांबला होता. निशाचे घर लहान असल्याने तिच्या आई-वडिलांनी आरोपी शिवा याच्याजवळ झोपण्यास सांगितले. 

21 जूनला मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास शिवाने निशा झोपलेली असताना अश्‍लील चाळे केले. तिची छेडखानी केली. ती झोपेतून उठली असता त्यावेळी शिवाने झोपेचे सोंग घेतले होते. दुसऱ्या दिवशी निशाच्या आईने शिवाच्या बेडवर झोपण्यास सांगितले. मात्र, निशाने नकार दिला. त्यामुळे तिच्या आईने खाली जागा नसल्याचे सांगून शिवाच्या बेडवर झोपण्यास सांगितले. त्या दिवशी शिवाने मध्यरात्री सर्व जण झोपी गेल्याचा फायदा घेत निशाच्या अंगावरील कपडे काढले. 

त्यावेळी निशा झोपेतून उठली असता शिवाने तिचे तोंड दाबले आणि ओरडल्यास तुझीच बदनामी करण्याची धमकी दिली. शिवाने मध्यरात्रीनंतर दोनदा बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पाहुणा आलेल्या शिवाला चटक लागल्याने आणि निशाने कुणाकडेही तक्रार न केल्यामुळे फावले. त्यानंतर रोज निशासोबत मध्यरात्रीनंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. 26 जूनला शिवा शर्मा परत जयपूरला निघून गेला. दरम्यान, निशा पूर्णपणे भेदरली होती. 
 

मित्रांनी दिली हिंमत

 
शिवाने केलेल्या कुकृत्याबाबत आई-वडिलांना सांगण्याची हिंमत निशाने केली नाही. मात्र, तिने तिची मैत्रीण सिमरनला फोन केला. गेल्या आठ दिवसांपासून बलात्कार सहन करीत असल्याचे तिला सांगितले. सिमरन फरझान व शोएब या मित्रांसह निशाच्या घरी आली. तिघांनाही हकिकत सांगितली. मैत्रिणीला अंगावर असलेले ओरबडे आणि होणाऱ्या शारीरिक त्रासाबद्दलही सांगितले. तिघांनीही निशाला डॉक्‍टरकडे नेले आणि उपचार करवून घेतले. 
 

आई-वडिलांनी दिली हिंमत 


निशाच्या मित्र आणि मैत्रिणीने हिंमत दिली. त्यानंतर आई-वडिलांशी तिघांनीही शिवाने केलेल्या बलात्काराबाबत चर्चा केली. निशा मनाने खचली असल्याचे सांगितले. शेवटी आई-वडिलांनी निशाला हिंमत दिली. तिला घेऊन ते तहसील पोलिस स्टेशनला गेले. पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी शिवा शर्माविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Train: मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेनला RPF कवच मिळणार! 'या' स्थानकांवर स्टेशन उभारणार; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी योजना

Tilak Varma T20 Record : तिलक वर्माचा ‘T20’ मध्ये बडा कारनामा!, 'या' बाबतीत विराट अन् शुभमनलाही टाकलं मागं

वने तू कमाल आहेस! वनिता खरातचा नव्या घरात गृहप्रवेश; 'या' ठिकाणी २३ व्या मजल्यावर घेतलंय हक्काचं घर

IPL Mock Auction: भारतीय फिरकीपटूंना मोठी मागणी, 'हा' खेळाडू ठरला सर्वात महागडा; पाहा टॉप-५ लिस्ट

Pune Municipal Election Update : महापालिका निवडणुकांचा बिगुल तर वाजला; जाणून घ्या, पुण्यात सध्या काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT