नागपूर

Good news : तांत्रिक कारणाने रद्द झालेल्या परीक्षा शनिवारपासून

मंगेश गोमासे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) परीक्षा एक महिना स्थगित करण्याचे आदेश कुलगुरूंनी दिले. यामध्ये विद्यापीठातील २१ हिवाळी परीक्षांसह (Winter exams) मार्च महिन्यात तांत्रिक कारणामुळे पेपर देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या वेळापत्रकाची सोमवारी (ता.१७) घोषणा (Announcement of schedule) करण्यात आली. त्यानुसार या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा शनिवारपासून (ता.२२) ते ९ जूनदरम्यान घेण्यात येणार आहेत. (cancelled Exams start from Saturday Nagpur university news)

विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेदरम्यान काही पेपरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने विद्यार्थी परीक्षेला मुकले होते. त्यामुळे या विद्यार्थ्याच्या फेरपरीक्षा घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले होते. यामध्ये एकूण प्रथम, तिसऱ्या, पाचव्या आणि सातव्या सेमिस्टरच्या ६२ विषयांच्या पेपरचा समावेश होता. आता या परीक्षा २२ ते २६ जूनदरम्यान सकाळी ८ ते ५.३० या कालावधीत घेण्यात येतील. यामध्ये ४ हजार ४७१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश बऱ्याच उशिरापर्यंत चालले.

त्यामुळे या विद्यार्थ्यांचा ९० दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे विद्यापीठाने या परीक्षा उशिरा घेण्याचे ठरविले. मात्र, दहा दिवसांपूर्वी राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने विद्यापीठाने सर्व परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यापीठाद्वारे जाहीर परिपत्रकात पुन्हा ९ हिवाळी परीक्षा स्थगित करण्यात आल्यात. याशिवाय विद्यापीठाने यापूर्वी १२ परीक्षा स्थगित केल्या होत्या. यामुळे आता एकूण २१ परीक्षा आता २७ मे ते ९ जूनदरम्यान घेण्यात येणार आहेत.

उन्हाळी परीक्षा १५ जूनपासून

विद्यापीठाच्या लांबलेल्या उन्हाळी परीक्षा येत्या १५ जूनपासून सुरू होणार आहे. त्यात १५ जूनपासून उन्हाळी परीक्षांचे प्रात्यक्षिक घेण्यास सुरुवात होणार आहे. याशिवाय २९ जूनपासून लेखी परीक्षा घेण्यात येतील. यामध्ये तीन वर्षीय अभ्यासक्रमातील सहावे सेमिस्टर, चार वर्षीय अभ्यासक्रमातील आठवे आणि दोन वर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रमातील चौथे सेमिस्टरची परीक्षा विद्यापीठ स्तरावर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येतील. इतर सेमिस्टरबाबतीत अद्याप निर्णय घेण्याला नाही. याशिवाय ५ ते २० मेदरम्यान होणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या हिवाळी परीक्षा आता महाविद्यालयांना ३१ मेपर्यंत घेण्यात येईल.

या आहेत परीक्षा

  • २२ मे ते २७ जून

  • बीए, बी.कॉम, बी.एसस्सी, बीएसडब्ल्यू, डीएमएलटी, बीपीएड

२७ मे ते ९ जून

  • बीई-१, बीटेक-१, बी.फार्म-१, बीई-३, बीटेक-३, बी.फार्म-३, एलएलबी-१(तीन वर्षीय), बीएएलएलबी-१(पाच वर्षीय) अभ्यासक्रम आणि इतर बारा अभ्यासक्रम.

(cancelled Exams start from Saturday Nagpur university news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT