The capital was shaken by two massacres 
नागपूर

Breaking : माजी नगरसेवकाचा भरचौकात कुऱ्हाडीने सपासप वार करून खून

अनिल कांबळे

नागपूर : गेल्या चोवीस तासांत घडलेल्या दोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली. हुडकेश्‍वरमध्ये गॅंगवॉरमधून युवकाचा खून झाला तर सदरमध्ये माजी नगरसेवकाचा भरचौकात दोघांनी ‘गेम' केला. या हत्याकांडांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवा उसरे (वय ५२) हे गड्डीगोदाम परिसराचे माजी नगरसेवक होते. ते रविवारी सकाळी आठ वाजता नेहमीप्रमाणे चहा घेण्यासाठी सदरमधील भारत टॉकिज चौकात आले होते. चहा घेतल्यानंतर ते टपरीच्या बाजूला बसले होते. दरम्यान दुचाकीवरून दोन युवक आले. त्यांनी पाठीमागे लपवलेली कुऱ्हाड काढली आणी थेट देवा यांच्यावर सपासप वार करणे सुरू केले.

देवा यांच्या छातीवर आणि डोक्यावर जबर घाव लागल्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. अचानक झालेल्या हल्ल्याने ते भांबावले आणि काही कळायच्या आतच बेशुद्ध पडले. रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडल्यानंतर मारेकरी थांबले. देवा यांचा जीव गेल्याचे समजून आरोपींनी पळ काढला.

चहा विक्रेत्याने लगेच सदर पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिसांचा ताफा लगेच पोहोचला. जखमी देवा यांना मेडिकलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्याने डाॅक्टारांनी मृत घोषीत केले. उसरे यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. पोलिस मारेकऱ्यांच्या शोधकार्यात लागले आहे.

दोन वेळा होते नगरसेवक

देवा उसरे दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. पहिल्यांदा अपक्ष तर दुसऱ्यांदा काॅंग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते. माजी महापाैर राजेश तांबे यांचा त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीत पराभव केला होता. त्यांच्या परिसरात ते चांगलेच लोकप्रिय होते. जमिनीच्या वादातून आणि जुन्या वैमनस्यातून त्यांची हत्या करण्यात आल्याची चर्चा घटनास्थळी होती.

गॅंगवॉरमधून युवकाचा खून

परिसरातील वर्चस्वावरून चौघांनी एका युवकाचा चाकू भोसकून खून केला. शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास हे हत्याकांड घडले. चेतन किशोर मेटांगळे (वय २७, रा. लाडीकर ले-आउट, मानेवाडा रिंगरोड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. आरोपी बादल नेताम, नीलेश गेडाम, रोशन धुर्वे आणि अश्‍वीन या चौघांचे परिसरात वर्चस्व आहे. ते गुंडगिरी करतात. चेतनने शनिवारी रात्री आठ वाजता दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली होती. दरम्यान, चौघांनी चाकूने भोसकून चेतनचा खून केला. माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांचा ताफा घटनास्थळावर पोहोचला. मृतदेह मेडिकलला रवाना केला. याप्रकरणी भाऊ सचिन याच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बादल, नीलेश व रोशनला अटक केली असून, अश्‍वीनचा शोध सुरू आहे.

 संपादन - नीलेश डाखोरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT