The Caste Validity Certificate online system is a headache Nagpur news 
नागपूर

जलदगतीने सोयीच्या नावाखाली सुरू केलेली ऑनलाईन प्रणाली ठरतेय डोकेदुखी

नीलेश डोये

नागपूर : जलदगतीने सोयीच्या नावाखाली जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन प्रणाली सुरू करण्यात आली. परंतु, ही व्यवस्था विभागातील अधिकाऱ्यांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आहे.

सातत्याने सर्व्हर डाऊन तसेच इंटरनेटला गती मिळत नसल्याने कामांना विलंब होत आहे. परिणामी कामांचा बोजा वाढत असून, जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या प्रणालीच्या कासवगतीच्या तक्रारीची वरिष्ठांकडून दखल घेण्यात येत नसल्याने अधिकारी, कर्मचारीही नाराजी व्यक्त करीत आहे. 

व्यावसायिक अभ्यासक्रमाचे नवीन सत्र सुरू होत आहे. सोबतच ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्जाचे प्रमाण वाढले आहे. सर्वांना मुदतीत वैधता प्रमाणपत्र द्यायचे आहे. ते न दिल्यास त्यांचे नुकसान होणार आहे. प्रमाणपत्रासाठी ऑनलाइनची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे विभागाचे काम अधिक गतीने होणार असून विभागासाठी सोयीचे ठरणार असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु, नेमके उलट होत आहे.

इंटरनेटची गती मिळत नसून सर्व्हरही डाऊन असते. त्यामुळे एका कामासाठी बराच वेळ लागतो. ऑफलाइन कामापेक्षाही अधिक वेळ यात खर्ची होत आहे. कोर्ट प्रकरणासाठी ऑनलाइन संदेश व रिजेक्ट नोटीसची सुद्धा मिळत नाही. बरेचदा प्रकरणे प्रलंबित असते. त्यांचे स्टेटस् कळत नाही. पडताळणी प्रमाणपत्रही तयार होत नाही. अर्जदाराला त्रुटी कळण्यात विलंब होत आहे.

त्रुटींची पूर्तता केल्यानंतरही तिघांना अर्ज तपासावा लागतो. एक किंवा दोन सदस्यांनी तपासल्यावर त्रुटी अर्जदारास कळविण्याची सोय नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विभागातील अधिकाऱ्यांनी अनेकदा याची माहिती वरिष्ठ पातळीवर दिली. परंतु त्याची कोणत्याही प्रकारची दखलच घेण्यात येत नसल्याचे नाराजी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT