Human trafficking Human trafficking
नागपूर

‘कॅटरिंग’च्या नावावर मानवी तस्करी! अंमली पदार्थांचाही समावेश

मंगेश गोमासे

नागपूर : ‘कॅटरिंग’ व्यवसाय (Catering) आणि इव्हेंटच्या नावाने महिला आणि तरुणींना देशभरात नेऊन त्यांच्या माध्यमातून अंमली पदार्थ आणि तरुणींची तस्करी (Human trafficking) करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका ‘ऑडिओ कॉल’वरून पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. याप्रकरणी नागपूरच्या रिंग रोडवर असलेल्या लक्ष्मी हॉटेलच्या मालकासह सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. (Human trafficking)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक ललित पांडे, सोनू ठाकूर हे अमली पदार्थ तस्करी आणि मानवी तस्करीमध्ये (Human trafficking) विशाल उर्फ दत्तू अंबद दाभणे, सचिन इंगळे, निखिल उर्फ सत्यजित रमेश बांगडे, विक्की भोसले अशी आरोपींची नावे आहेत. अभिषेक पांडे याचा कॅटरिंग आणि इव्हेंटचा व्यवयाय आहे. तो ओडिशा आणि देशभरात कार्यक्रमांच्या ऑर्डर घेतो. त्याच्या पथकात काम करणाऱ्या महिलांच्या माध्यमातून त्यांना माहिती न होऊ देत पांडे गांजा व अंमली पदार्थ्यांची तस्करी करायचा.

पोलिसांनी या प्रकरणी दोघांना बेड्या ठोकल्या. तर दुसऱ्या प्रकरणात तरुणींची तस्करी, विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत चार आरोपींना अटक केली. विशाल उर्फ दत्तू अंबद दाभणे, सचिन इंगळे, निखिल उर्फ सत्यजित रमेश बांगडे, विक्की भोसले हे इव्हेंटच्या नावाखाली काही तरुणींना हेरत त्यांना पैशाचे आमिष देत, देहव्यापार करायला भाग पाडायचा.

एवढेच नव्हे तर या कामासाठी इतरत्र लागणाऱ्या तरुणींची विक्री करण्याचा व्यवसाय करायचे. ऑडिओ क्लिप व्हायरल होताच पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरविली. त्यातून दोन्ही प्रकरण समोर आली. सध्या अंमली पदार्थ तस्करी प्रकरणातील गोल्डी उर्फ अमन गणवीर, सुरज तिवारी, इमरान हे चार आरोपी फरार आहेत.

महिला, तरुणींचा वापर

अभिषेक पांडे कॅटरिंग (Catering) आणि इव्हेंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गांजासह इतर अंमली पदार्थ्याची तस्करी ओडिशासह देशातील इतर भागात करायचे. त्यासाठी ते शहरातील महिलांना कॅटरिंग आणि तरुणींना इव्हेंटसाठी न्यायचे. तरुणींच्या (Human trafficking) बॅगमध्ये गांजा व इतर अंमली पदार्थ भरण्यात येत असे, अशी माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT