या प्रकाराचे पालन जिल्ह्यातील अनेक वाळूघाटावर होताना दिसून येत नाही. सरकारच्या आदेशाचे पालन घाटमालक का करीत नाही, यावर प्रश्नाचे ताशेरे समोर येत आहे. सावनेर तालुक्यातील अनेक वाळूघाटावरून वाळूचोरीच्या घटना समोर येत असतात. 
नागपूर

वाळूघाटांवरील तिसरा डोळा गेला कुठे? सर्रास होतेय वाळूचोरी; बुडतोय लाखोंचा महसूल 

सकाळ डिजिटल टीम

खापरखेडा (जि. नागपूर) :  राज्य सरकारने घाटावरील वाळूचोरीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य केले होते. मात्र अद्यापही घाटाच्या निरीक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले नसल्याने सीसीटीव्ही कॅमेरे बेपत्ता झाले काय, असा सवाल नागरिक करू लागले.

या प्रकाराचे पालन जिल्ह्यातील अनेक वाळूघाटावर होताना दिसून येत नाही. सरकारच्या आदेशाचे पालन घाटमालक का करीत नाही, यावर प्रश्नाचे ताशेरे समोर येत आहे. सावनेर तालुक्यातील अनेक वाळूघाटावरून वाळूचोरीच्या घटना समोर येत असतात. एकीकडे घाटावर वाळूची उचल पावड्याने व घमेल्याद्वारे भरणे अपेक्षित असून ट्रॅक्टरने वाहतूक करण्याचा अधिकार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

परंतु घाटावर पोकलेन जेसीबीसारख्या मशीनचा उपयोग करून जड ट्रकमध्ये भरून वाहतूक होत असते. शिवाय नियोजित सिमांकनाच्या बाहेरही वाळूचे उत्खनन करून वाळूचोरीचा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे. यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडत असून महसूलामध्ये मंदी येत असल्याची संभावना व्यक्त केली जाते. 

वाळूचोरी थांबविण्यासाठी घाट व घाटावरून बाहेर निघणाऱ्या मार्गापर्यंत सीसीटीव्ही लावण्याची गरज असून सीसीटीव्हीमध्ये असलेली जमा रेकॉर्डिंग महसूल विभागात देण्याचा नियम असल्याचे बोलले जाते. एकीकडे महसूल विभागातील काहींना वाळूव्यावसायिक ‘मॅनेज’ करीत असल्याने सीसीटीव्हीच्या आदेशाचे पालन घाटसंचालक करीत नसल्याने ‘तेरी भी चूप, मेरी भी चुप’ असा प्रकार असल्याचे नागरिक बोलत असतात. वाळूचोरीवर आळा बसण्यासाठी जे वाळूव्यावसायिक निर्देशांचे पालन करीत नाही अशांवर कारवाई अपेक्षित असते. 

या संदर्भात तेलंगणा पॅटर्ननुसार घाट चालावे यासाठी पालकमंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांचा मिटिंग घेतली होती. सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याची माहिती आवेदकाला देण्यात आली होती. यामुळे संबंधित प्रशासनाच्या माफियांना आशीर्वाद तर नाही ना, अशाही विधानाला तर्कवितर्क लावले जात आहे.

घाटांचा ताबा वाळूमालकाकडे

जिल्ह्यात २४ घाटाची निलामी प्रक्रिया करण्यात आली होती. यामध्ये १९ घाटनिलामी खरेदी करण्यात आले. परंतु आतापर्यंत चिकना, शिवरा, टेंभुरडोह, खापा पेठ, करजघाट, इसापूर आदी घाटाचा ताबा वाळूमालकाकडे देण्यात आला. मात्र रायवाडी घाटांचा ताबा अद्यापही देण्यात आला नाही. तरीही या घाटांवरून अवैध वाळूचोरी होत असल्याचे ग्रामस्थ बोलू लागले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Satara MLC Result : सांगली-साताऱ्यात जयंत पाटलांना मोठा धक्का! भाजपच्या धैर्यशील कदमांनी शरद पवार गटाचा गेम उलटवला; पाहा किती मतांनी केला पराभव

Maharashtra Legislative Council Results : महायुतीचा विधानपरिषदेत दणदणीत विजय; ११ पैकी १० जागा खिशात, नाशिकमध्ये अपक्ष गितेंनी दिला धक्का

Gold-Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात एकाच दिवशी प्रचंड उसळी; चांदी तब्बल 4,000 ने महागली, सोन्याचा काय भाव? पाहा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

Yashasvi Jaiswal: तंबूत राहणाऱ्या मुलाने वडिलांना दिली 1.32 कोटींची कार; यशस्वी जैस्वालची ही भेट पाहून तुम्हीही भावूक व्हाल!

Latest Marathi News Live Update : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील पहिला टप्पा जून अखेरपर्यंत पूर्णत्वास

SCROLL FOR NEXT