crime news sakal
नागपूर

चंद्रपूर : युवकांना करंट देऊन मारहाण

शिकारीच्या संशयातून वनविभागाचा अमानुष अत्याचार; चिंचोलीतील प्रकार

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : शिकारीच्या संशयावरून पायली-भटाळी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या चिंचोली गावातील युवकांना विजेचा शॉक देऊन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अमानुषपणे मारहाण केली. या प्रकरणाची तक्रार गावकऱ्यांनी दुर्गापूर पोलिस ठाण्यात केली; मात्र अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी शुक्रवारी (ता. २६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून न्यायाची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

चंद्रपूरला लागूनच पायली-भटाळी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीअंतर्गत येणारे चिंचोली हे गाव ताडोबा जंगलाला लागूनच आहे. या गावात २४ नोव्हेंबर रोजी वन्यजीवाची शिकार झाल्याची माहिती वनविभागाला मिळाली. याच माहितीच्या आधारे वनविभागाचे काही कर्मचारी गावात आले. त्यांनी आधी हनुमान आसुटकर या युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर संदीप आसुटकर, ईश्वर रामटेके यांनाही गावातून उचलले.

त्यांना वनविभागाच्या रामबाग नर्सरीत आणून बेदम मारहाण केली. त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी आकाश चांदेकर, संदीप नेहारे, संदीप आसुटकर, मंगेश आसुटकर आणि सुधीर आसुटकर यांनाही ताब्यात घेऊन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. चार्जिंग बॅटरीद्वारा हात, पायाला करंट देऊन अमानुष पद्धतीने मारहाण केली. त्यानंतर आणखी काही जणांना ताब्यात घेण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी गावात आले.

त्यावेळी गावकऱ्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना अटकाव केला. आकाश चांदेकर, संदीप नेहारे, संदीप आसुटकर, मंगेश आसुटकर, ईश्वर रामटेके, हनुमान आसुटकर आणि सुधीर आसुटकर यांना सोडण्याची मागणी केली. गावकरी संतप्त झाल्याचे पाहून ताब्यात घेण्यात आलेल्या युवकांना सोडण्यात आले. या प्रकाराने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी दुर्गापूर पोलिस ठाणे गाठले. तेथे वनविभागाच्या काही अधिकाऱ्यांची तक्रार दाखल केली. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नाही. त्यामुळे शुक्रवारी गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. पीडितांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले.

माहिती घेऊन सांगतो

याप्रकरणी ताडोबा बफरचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांना विचारणा केली असता हे प्रकरण आपल्याकडे येत नसल्याचे सांगितले. ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांना विचारणा केली असता याबाबत काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. माहिती घेऊन सांगतो, असेही त्यांनी सांगितले.

दोघांवर गुन्हे दाखल

दरम्यान, चिंचोली गावातील युवकांना मारहाण केल्याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी वनरक्षक भीमनवार, यादव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती दुर्गापूरचे ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी दिली.

शिकार झालीच नाही

वनविभागाला शिकारीची माहिती मिळाली. त्यानंतर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. तिथे कोणत्याही प्राण्याची शिकार झाली नव्हती. असे असतानाही वनविभागाने चिंचोलीतील युवकांना ताब्यात घेऊन अमानुषपणे मारहाण केली. यामुळे गावकऱ्यांत संताप व्यक्त करण्यात येत आहे. मारहाण करणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dahisar Fire: दहिसरमध्ये आगीचं रौद्ररूप, परिसरात धुराचे मोठे लोट; गॅरेजला अचानक लागलेल्या आगीचा VIDEO VIRAL

Kagal Peth Naka Highway : कागल-पेठनाका 65 किमी महामार्गाचे काम पुन्हा रखडले! 1200 कोटींचा नवा आराखडा; वाहनचालकांना आणखी अडीच वर्षे वाट पाहावी लागणार?

हर्षवर्धन राणे 'या' बॉलिवूड अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये? पुण्याजवळील पानशेतमध्ये दोघांची गुपचूप ट्रिप? एका पोस्टने वाढली चर्चा

Horrible Video: सेलिब्रेशन पडले महागात, ब्राझिलचा फुटबॉलपटू थेट पडला 'खोल' खड्ड्यात; Live सामन्यातील घटनेनंतर सर्वांची पळापळ

Marathi News Live Updates : मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्यता, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT