chandrashekhar bawankule
chandrashekhar bawankule e sakal
नागपूर

बावनकुळेंची धडपड कशासाठी? 'त्या' रिक्त जागेसाठी भाजप तगड्या उमेदवाराच्या शोधात

राजेश चरपे

नागपूर : माजी ऊर्जामंत्री तसेच भाजपचे (BJP) प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे (former energy minister chandrashekhar bawankule) पुन्हा सक्रिय झाले असून नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रिक्त होणाऱ्या जागेसाठी त्यांची धडपड सुरू असल्याचे बोलले जाते. मात्र, ज्या कारणासाठी कामठी विधानसभा मतदारसंघाची (kamptee assembly constitution) त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती ते प्रकरण अद्याप गुलदस्त्यात असल्याने सर्वच साशंक आहेत. (chandrashekhar bawankule trying for council election from nagpur)

भाजपच्या कार्यकाळात बावनकुळे पाच वर्षे ऊर्जामंत्री होते. याशिवाय अबकारी खाते देऊन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांना करण्यात आले होते. भंडारा आणि वर्धा जिल्ह्याचेही काही वर्षे ते प्रभारी पालकमंत्री होते. भाजपचे ऊर्जावान मंत्री म्हणून त्यांची ओळख होती. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही ते लोकप्रिय होते. कामठी विधानसभा मतदारसंघातून हमखास निवडून येण्याची त्यांची खात्री होती. सर्व काही आलबेल असताना त्यांचे वरिष्ठांसोबत बिनसले. उमेदवारी दाखल करायच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना प्रतीक्षा करायला लावली. शेवटचा एक तास शिल्लक असताना त्यांना डावलून सावरकर यांना उमेदवारी दिली. बावनकुळे यांचे कोणासोबत बिनसले, त्यांचे तिकीट कोणी कापले, त्याची कारणे काय हे अद्याप कोणालाच उमगले नाही. स्वतः बावनकुळे या विषयावर बोलण्यास तयार नाहीत. अदानी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नाव घेऊन अनेक कहाण्या रंगवून सांगण्यात येतात. मात्र, ते सर्व तर्क आहेत.

ठोस माहिती कोणीच सांगत नाही. भाजपच्या काही मोजक्या आणि बड्या नेत्यांनाच ते माहीत असावे. त्याशिवाय कोणाला माहीत असले तरी कोणी उघडपणे बोलण्याचे धाडस करीत नाही. मध्यंतरी भाजपने शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांना विधान परिषदेत पाठविले. त्यावेळीसुद्धा बावनकुळे यांच्या नावाची चर्चा होती. त्या संदर्भात दिल्ली वाऱ्याही त्यांनी केल्या होत्या. मात्र, वरिष्ठांनी फुली मारली. भाजपची सत्ता नसल्याने राज्यपाल नियुक्त कोट्यांमध्येही त्यांचा समावेश होणे अवघड आहे. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार गिरीश व्यास यांची जागा रिक्त होत आहे. ते बिनविरोध निवडून आले होते. यावेळी निवडणूक होण्याची शक्यता आहे. याशिवाय जिल्हा परिषद भाजपने गमावली आहे. त्याशिवाय ग्रामीण भागात भाजपचे फक्त दोनच आमदार आहेत. त्यामुळे ही जागा कायम राखण्यासाठी भाजपला सर्वच दृष्टीने ‘तगडा‘ उमेदवार द्यावा लागणार आहे. निवडणूक बिनविरोध झाल्यास बावनकुळे यांना उमेदवारी मिळवणे आणखीच अवघड ठरेल असे मत राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT