Citizens confused as they were separated for sixteen days 
नागपूर

Video : 'कोरोना'बाधित बरे होऊन गेले घरी; संपर्कातील व्यक्‍ती 16 दिवसांनीही विलगीकरणातच असल्याने केले हे...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बाहेरून प्रवास करून आलेले तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना विलगीकरणासाठी नागपूरच्या विविध ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. आमदार निवासात ठेवण्यात आलेल्या नागरिकांचे अहवाल प्रलंबित आहेत. विलगीकरणातील काही नागरिकांना 16 दिवसांचा कालावधी लोटून गेला आहे. बाधित असलेली व्यक्ती घरी गेली; परंतु संपर्कातील व्यक्ती अद्याप विलगीकरण कक्षात आहेत. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी चांगलाच गोंधळ घातला. 

विलगीकरणातील व्यक्तींच्या अहवालाबाबत मनपाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच प्रशासनात समन्वय नाही. यामुळे घोळ झाला आहे. याविरोधात विलगीकरणातील नागरिकांनी रविवारी (ता. 12) सकाळी आमदार निवासातील पायऱ्यांवर बसून "हरे राम हरे कृष्ण' असे भजन गात टाळ्यांचा गरज करीत आंदोलन केले. तब्बल दोन तासांनंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. 

विलगीकरणातील नागरिकांशी संवाद साधला असता, त्यांनी आम्ही प्रशासनाला मदत करतो. त्यांनी सांगितले की, येथे राहा तर निमूटपणे राहात आहोत. परंतु, आमच्या चाचण्यांचा अहवाल आला आहे किंवा नाही, याबाबत विचारणा केली तर प्रशासनाकडून टोलवाटोलवी केली जाते. अहवाल आल्यानंतरही अहवाल आला नाही, असे सांगण्यात येत आहे. एका डॉक्‍टरला विचारले असता, ते सांगतात की, अहवाल आला. दुसऱ्यांना विचारल्यास सांगतात की, अहवाल अद्याप आला नाही. 

मेयोतील एक यंत्र बंद पडल्याने कोरोना विषाणूच्या अहवालावरून घोळ निर्माण झाला. विशेष असे की, खामला येथील कोरोनाबाधित रुग्ण बरा होऊन घरी गेला. परंतु, विलगीकरणात ठेवलेल्या नागरिकांचे अद्याप अहवालच आले नाही. 16 दिवसांचा कालावधील लोटून गेल्यानंतरही महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून छळ मांडला असल्याचे त्यांनी सांगितले. 

घरी निघत असलेली महिला पुन्हा विलगीकरणात

जरीपटका येथील एका महिलेचा अहवाल "निगेटिव्ह' आला. यानंतर तिला सुटी देण्यात आली. यामुळे तिच्या हातावर स्टॅम्प मारून तिची रवानगी केली. बाहेर निघताच महिला रिक्षात बसली. परंतु, अचानक एक जण धावत आला. अद्याप अहवाल यायचा आहे. तुम्हाला जाता येणार नाही, असे सांगत पुन्हा आमदार निवासातील विलगीकरण कक्षात परत आणले. असा अजब प्रकार सुरू आहे. प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्यानेच असे अफलातून प्रकार घडत असल्याची जोरदार चर्चा येथे आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हापूसला आंब्याला लेबल लागणार? महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाची मागणी

Yavatmal Crime News : नग्न करून अमानुष मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, चौघांना अटक

काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवणार, उमेदवारही केला जाहीर; उद्या अर्ज भरणार

Mumbai News: ११३ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा! पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन दुवा लवकरच आकारास येणार

आखाती युद्धाचा कांद्याला मोठा फटका; निर्यात ४५ टक्के घसरली, दर कोसळल्याने शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT