नागपूर

दहावीच्या विद्यार्थिनीवर वर्गमित्राने केला अत्याचार; नागपुरात गुन्हा दाखल

अनिल कांबळे

नागपूर ः दहावीत शिकणाऱ्या मुलीचे वर्गमित्रावर प्रेम जडले. दोघांनी सीमा ओलांडून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, या दरम्यान मित्राने प्रेयसीच्या मैत्रिणीलाही पटवले. ही बाब उघडकीस येताच प्रेयसीने आईला सर्व हकीकत सांगून पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. (Classmate of 10th standard girl physically misbehaved with her in Nagpur)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी रिया (बदललेले नाव) ही एमआयडीसी परिसरात राहते. ती आणि आरोपी सुशांत (बदललेले नाव) हे दोघेही आठव्या वर्गापासून एकाच शाळेत शिकतात. त्यामुळे त्यांच्यात ओळख होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघेही एकाच शाळेत शिकत असल्याने त्यांची नेहमीच भेट होत होती. नववीत असताना दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले.

हिंगणा येथील सूतगिरणीजवळ पीडित मुलीची मैत्रिण राहते. मैत्रिणीचा पती कामावर गेला की, दोघेहीजण तिच्या घरी जात होते. तेथे गेल्या दोन वर्षांपासून दोघेही शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होते. ९ मे रोजी सुशांतने तिला फोन करून भेटण्यासाठी बोलविले. परंतु, त्यादिवशी तिचे वडील घरी असल्याने ती गेली नाही. त्यावर तो तिला आत्महत्या करण्याची धमकी देत होता. त्यामुळे ती भेटायला गेली.

असे फुटले बींग

मैत्रिणीच्या घरात शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर तो बाहेर गेला. दरम्यान त्याचा मोबाईल रियाच्या हाती लागला. मोबाईलमध्ये तिला मैत्रिणीचे फोटो आणि मॅसेज दिसून आले. तिच्यासोबतही सुशांतचे अनैतिक संबंध होते. ही बाब उघडकीस येताच दोघांत कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे तिने त्याला भेटण्यास मनाई केली. तरीही तो तिच्यावर दबाव आणत होता. हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आला. तिने मुलीची विचारपूस केली असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो अन्वये गुन्हा नोंदवून मुलाला ताब्यात घेतले.

(Classmate of 10th standard girl physically misbehaved with her in Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Dattatraya Meghe Passes Away: लोकसेवेचा वटवृक्ष निमाला! माजी खासदार, लोकनेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विविध क्षेत्रात हाेता दबदबा..

Pune Accident: पुण्यातील मुथाळणे घाटात शेतमजूरांची पिकअप पलटली; एक गंभीर तर १८ किरकोळ जखमी!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT