Cleaning of all rivers and drains in Nagpur 
नागपूर

तुकाराम मुंढे म्हणाले, लॉकडाउननंतर जेव्हा घराबाहेर पडाल तेव्हा दिसेल स्वच्छतेचे सुंदर चित्र...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात लॉकडाउन सुरू आहे. नागरिकांना घराबाहेर निघण्यास मनाई आहे. यामुळे रस्त्यांवरची वर्दळ कमी झाली आहे. नागरिकांचा समूह कुठेही पाहायला मिळत नाही. मोलमजुरी करणारेही रस्त्यावर दिसून येत नाही. अशातच महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी स्वच्छतेवर भर दिला आहे. लॉकडाउननंतर जेव्हा नागरिक घराबाहेर पडतील, तेव्हा नाला स्वच्छतेचे सुंदर चित्र त्यांना बघायला मिळेल, असा आशावाद व्यक्‍त केला आहे. 

शहरातील दहाही झोनमध्ये 227 नाले आहेत. यापैकी 71 नाल्यांची पोकलेनद्वारे स्वच्छता करण्यात येणार आहे. उर्वरित नाल्यांची स्वच्छता मनुष्यबळाद्वारे करण्यात येईल. यातील बहुतांश नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा जमा झाला आहे. यामुळे नाल्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात धोका निर्माण होतो. मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थितीही निर्माण होते. हे सर्व टाळण्यासाठी संपूर्ण नाले स्वच्छ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार नाल्यांच्या स्वच्छतेच्या कामालाही सुरुवात झाली आहे.

सध्या धरमपेठ, हनुमाननगर, नेहरूनगर, गांधीबाग आणि आशीनगर या पाच झोनअंतर्गत असलेल्या 133 नाल्यांमध्ये पाच पोकलेनद्वारे स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दोन टन क्षमतेची एक, चार टन क्षमतेची एक, आठ टन क्षमतेच्या दोन आणि 11 टन क्षमतेची एक मशीन कार्यरत आहेत. नाला स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी झोनचे मुख्य स्वच्छता अधिकारी, वॉर्डचे स्वच्छता निरीक्षक, वॉर्डचे कनिष्ठ अभियंता आणि यंत्र अभियांत्रिकी विभागाकडे सोपविण्यात आली आहे. नाला स्वच्छतेदरम्यान निघणारा गाळ हा परिसरातील सखल भागात टाकण्यात येणार आहे. 

31 मेपर्यंत संपूर्ण नाले स्वच्छ

नाग, पिवळी आणि पोहरा नदीचे स्वच्छता अभियान युद्धपातळीवर सुरू आहे. या नद्यांच्या स्वच्छतेसोबतच शहरातील दहा झोनमधील 227 नाल्यांच्या स्वच्छतेचाही निर्धार महापालिकेने केला आहे. नुकतीच पाच झोनमधील 133 नाल्यांच्या स्वच्छतेला सुरुवात झाली आहे. 31 मेपर्यंत शहरातील संपूर्ण नाले स्वच्छ करण्याचा मानस आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला आहे. 

झोननिहाय नाले   
झोन नाल्यांची संख्या 
लक्ष्मीनगर 22 
धरमपेठ 35
हनुमाननगर 14 
धंतोली 14 
नेहरूनगर 15 
गांधीबाग 51
सतरंजीपुरा 22 
लकडगंज   07
आशीनगर 18 
मंगळवारी 29 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHP Garba Ban : गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला केंद्रीय मंत्र्यांचा विरोध; संविधानाचा दिला दाखला

'बोक्या सातबंडे' चित्रपटात पेपर विकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का? आज मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवतोय, कोण आहे हा?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Nanded News : नवसंशोधनाला मिळणार नांदेडची प्रयोगभूमी; ग्रामीण टेक्निकल कॅम्पसकडे ‘आविष्कार २०२६’ची धुरा!

Ambad News : तलावात खांदेमळणीला गाय, बैल धूण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय सौरभ नरोडेचा पाण्यात बुडून मृत्यू; धनगरपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त

SCROLL FOR NEXT