Crime  sakal media
नागपूर

लिपिक व ऑडिटरला अटक : मनपा गैरव्यवहार; आतापर्यंत चौघे जेरबंद

६७ लाखांच्या स्टेशनरी व प्रिंटिंग साहित्य घोटाळाप्रकरणात सदर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

६७ लाखांच्या स्टेशनरी व प्रिंटिंग साहित्य घोटाळाप्रकरणात सदर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली.

नागपूर : महापालिकेतील (NAGPUR CARPORATION) ६७ लाखांच्या स्टेशनरी व प्रिंटिंग साहित्य घोटाळाप्रकरणात सदर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. सामान्य प्रशासन विभागाचे लिपिक मोहन रतन पडवंशी व ऑडिटर मोहम्मद अफाक अहमद ,अशी अटकेतील कर्मचाऱ्यांनी नावे आहेत. दोघांनी कोणतीही शाहनिशा केली नाही. अफाक यांनी बिले मंजूर केली. या घोटाळ्याप्रकरणात सदर पोलिसांनी गुरुवारी मनोहर साकोरे अॅण्ड कंपनीचे पद्माकर (कोलबा) साकोरे (वय ५५), सुषमा साकोरे (वय ५० दोन्ही रा. जयप्रकाशनगर), मनोहर साकोरे (वय ७० रा. दक्षिणामूर्ती चौक, महाल) व अतुल साकोरे (वय ४० रा. न्यू नंदनवन) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अटकसत्र सुरू केले. याप्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

या घोटाळ्यात यापूर्वी पद्माकर साकोरे, अतुल साकोरे या एजन्सी मालकांना अटक करण्यात आली. आतापर्यंत मनपातील या घोटाळ्यात चौघांना अटक करण्यात आली. यात आणखी काही मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मोठे अधिकारीही अडकण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीची इनसाईड स्टोरी! ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यावरुन प्रियंका गांधींचा संताप; म्हणाल्या....

Sachin Vaze: सचिन वाझेंची ५ वर्षांनी जामिनावर सुटका; ५ जिल्ह्यात प्रवेश न करण्याची अट

Stock Market Crash: 4 दिवसांत गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी स्वाहा! शेअर बाजार का कोसळला?

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

Heart Health: ताजी फळे खाणे की ज्युस पिणे? हृदयाच्या आरोग्यासाठी नक्की काय उत्तम? पाहा संशोधन!

SCROLL FOR NEXT