cloth store 
नागपूर

दुकान उघडताच नागरिकांनी लावल्या रांगा, चाळीस दिवसांनंतर मिळाली संधी

सकाळवृत्तसेवा

नागपूर : लॉकडाउनमुळे गेल्या चाळीस दिवसांपासून बंद असलेली कपडे, स्टेशनरीची दुकाने उघडताच आज ग्राहकांच्या रांगा दिसून आल्या. घरगुती वापराचे कपडे खरेदी करण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. परंतु, दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनच ग्राहकांना कपडे दिले. गेल्या महिन्याभरातील कपडे विक्रीचा हंगाम गेला असला तरी दुकानदारांतही उत्साहाचे वातावरण होते. 

गेल्या चाळीस-बेचाळीस दिवसांपासून शहरातील कपडे, स्टेशनरी, बांधकाम साहित्य विक्रीचे हार्डवेअर दुकाने बंद होती. केंद्र व राज्य सरकारने काही दुकाने सुरू करून लॉकडाउनमध्ये शिथिलतेची घोषणा केली. मात्र, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात पूर्वीसारखेच लॉकडाउन सुरू राहील, अशी भूमिका घेतली. अखेर महापालिकेतील पदाधिकारी, नागरिकांच्या वाढत्या दबावामुळे आयुक्तांनी काल, सोमवारी शहरातील होजियरी कपडे, स्टेशनरी व हार्डवेअरची दुकाने सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली. आज शहरातील अनेक भागांत होजियरी कपडे, स्टेशनरी आदींची दुकाने सुरू झाली. 

मानेवाडा रोडवरील जैन यांनी चाळीस दिवसांनंतर दुकान उघडल्याचे सांगितले. दुकाने उघडल्याचा आनंद असला तरी ऐन लग्नसराईचा निम्मा हंगाम निघून गेला असून अनेक लग्न रद्द झाले. त्यामुळे व्यवसायात मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी नमूद केले. सकाळपासून ग्राहकांची गर्दी आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात असून ग्राहकांना मास्क वापरणेही बंधनकारक केले आहे. दुकाने उघडण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या नियमाचे पालन केले जात आहे, असेही जैन त्यांनी नमूद केले.

दुकानातून प्रामुख्याने लहान मुलांचे "इनर वेअर', बर्म्युडा तर पुरुष, महिलांचेही अंतर्वस्त्रे विक्री होत आहे. स्टेशनरीची दुकाने उघडी झाल्याने घरांमध्ये असलेल्या "बच्चे कंपनी'साठी ड्रॉईंग शिट्स, कलर्स याशिवाय विविध वस्तू तयार करण्याचे साहित्य विक्री होत असल्याचे एका दुकानदाराने नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Aadhaar Card Update: 'आधार कार्ड'मधून खरंच नाव आणि पत्ता गायब होणार? सत्य काय आहे? सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण समोर

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

SCROLL FOR NEXT