coal  esakal
नागपूर

कोराडी वीज केंद्रात कोळशाची अफरातफर; महनिर्मितीची पोलिसात तक्रार

कोळसा खाणीतून चांगल्या दर्जाच्या कोळशाची उचल करून दुय्यम दर्जाचा कोळासा पुरवठा करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - कोळसा खाणीतून चांगल्या दर्जाच्या कोळशाची उचल करून दुय्यम दर्जाचा कोळासा पुरवठा करणाऱ्यांच्या विरोधात महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्यावतीने कोराडी पोलीस ठाण्यात अफरातफरची तक्रार नोंदवली आहे. यामुळे कोराडी वीज केंद्राचे सुमारे ८० हजाराचे नुकसान झाले आहे तसेच शासनाची फसवणूक करण्यात आल्याचे महानिर्मितीने तक्रारीत म्हटले आहे.

२८ सप्टेंबरला रात्री सुमारे एक वाजच्या सुमारास कोराडी वीज केंद्रात वेकोलीच्या गोंडेगाव कोळसा खाणीतून कोळसा घेवून संबंधित वाहतूक कंत्राटदाराचे वाहन क्रमांक एम.एच.२२- ए.ए.-३४१४ आले. या गाडीच्या नंबर प्लेटवर दुसऱ्या गाडीचे स्टीकर लावण्यात आले असल्याचे सुरक्षा रक्षकास आढळून आले. त्यानुसार तातडीने सदर वाहनाची तपासणी करण्यात आली.

प्रशासनाने सखोल चौकशी केली असता वाहन क्रमांक एम.एच.२२- ए.ए.-३४१४ हे भानेगाव टी पॉइंट येथे कोळसा भरून उभे होते. त्याऐवजी दुसरेचे वाहन कोराडीत पाठवण्यात आले. खापरखेडा पोलिसांनी वाहनचालक, कंत्राटदार पर्यवेक्षक ठाण्यात आणले. त्यात त्यांनी कोळशाचे वाहन बदलल्याची कबुली दिली.

मेसर्स बी.एम.एच. या कंपनीस कोराडी वीज केंद्रातर्फे कोळसा वाहतुकीवर जी.पी.एस. आर.एफ.आय.डी.द्वारे नियंत्रण व पाळत ठेवण्याचे कंत्राट दिले आहे. सदर वाहनामध्ये आर.एफ.आय.डी. घटनास्थळी लागलेले नव्हते. त्यामुळे बी.एम.एच. कंपनीच्या कर्मचाऱ्याची भूमिका संशयास्पद असून कंपनी मालक व सुपरवायझर यांचीही चौकशी केली जात आहे.

कोराडी पोलिसांनी वाहतूक कंत्राटदार मालक, गाडी मालक, वाहनचालक, बी.एम.एच. कंपनी कर्मचारी यांची चौकशी करून गुन्हा नोंदविण्याबाबत अर्ज दिला आहे. तसेच कोराडी वीज केंद्राच्या संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संकटात धावून आला ‘लालबागचा राजा’! भुलेश्वरचा राजा मंडळाला ११ लाख, तर मृतांच्या कुटुंबीयांनासाठीही आर्थिक मदत जाहीर

IND vs SL 2nd Test: यशस्वी जैस्वाल-असिथा फर्नांडो वादाचा नवा खळबळजनक Video समोर! ICC वर गंभीर आरोप... नेमकी 'ढुशी' मारली कोणी?

प्राजक्ता माळीला 'फरसाण'वरून का चिडवलं जातं? अभिनेत्याने सांगितला हास्यजत्रेच्या सेटवरचा मजेशीर किस्सा

Marathi News Live Updates : सुप्रीम कोर्टाचा आदेश; बलात्कार प्रकरणातील दोषी तरुण तेजपालला दोन आठवड्यांत शरणागती पत्करण्याचे निर्देश

leopard spotted in Satave Kolhapur : आरळे-शहापूर रस्त्यावर दोन बछड्यांसह बिबट्याचा वावर; तरुणांनी कॅमेऱ्यात कैद केला थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT