गोवारी समाज आदिवासी असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. त्या आधारे अनेकांना आदिवासीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळाले. दरम्यान राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले.  
नागपूर

गोवारी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयांचा नकार; आदिवासी विभागात करावी लागतेय पायपीट

निलेश डोये

नागपूर : जात वैधता प्रमाणपत्र असलेल्या गोवारी समाजाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांकडून शिष्यवृत्ती नाकारली जात असल्याचे प्रकरण समोर आले. विविध अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आदिवासी विभागाच्या कार्यालयात चकरा मारत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येणार

गोवारी समाज आदिवासी असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. त्या आधारे अनेकांना आदिवासीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळाले. दरम्यान राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने गोवारी समाजाच्या विरोधात निकाल दिला. परंतु वैधता प्रमाणपत्र मिळालेल्यांना शिक्षणात लाभ मिळेल, असे आदेशही दिले. परंतु यानंतरही महाविद्यालयांकडून शिष्यवृत्ती नाकारण्यात येत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. 

शिष्यवृत्तीकरिता महाविद्यालयाकडे अर्ज केले. परंतु प्रकल्प कार्यालयाने त्यांचे अर्ज रद्दबातल केले. त्यामुळे महाविद्यालयांनी त्यांना अभ्यासक्रमाचे लाखो रुपये शैक्षणिक शुल्क भरण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागातून आलेल्या या विद्यार्थ्यांनी आदिवासी विभागाकडे विचारणा केली. परंतु त्यांना विभागाकडून योग्य उत्तर मिळत नाही.

तिकडे महाविद्यालयांनी शैक्षणिक शुल्क भरण्याचा तगादा लावला आहे. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देता येतो की नाही, यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालयाकडे मार्गदर्शन मागितल्याचे सांगण्यात येते.

गोवारी समाजाला आदिवासीत समावेश करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. परंतु न्यायालयाने वैधता प्रमाणपत्र असलेल्यांना शिक्षणात संरक्षण दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवणे चुकीचे आहे. गरीब विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या भरवशावर असतात. त्याने नुकसान होईल. शिष्यवृत्ती नाकारल्याने अवमानना याचिका दाखल करण्यात येईल.
कैलास राऊत, अध्यक्ष, 
आदिवासी गोवारी समाज संघटना. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: आशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडिया पोहचली जपानला! आता कधी होणार सामने? जाणून घ्या Timetable

Pune Crime: ‘आमदारगिरी’चा बनाव तरुणाच्या अंगाशी! पुण्यात ऑडीवर लावलं 'आमदार' स्टिकर, मद्यधुंद अवस्थेत कार पळवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला घेतलं ताब्यात

Nandigram Express : नंदिग्राम एक्स्प्रेस चुकीच्या रुळावर लोको पायलटच्या सतर्कतेने अनर्थ टळला, किनवट स्थानकावर दोन तास खोळंबा

Latest Marathi News Update : मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे सरकारने केले विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Japan's Population: ११४ वर्षांच्या आजी अन् ११२ वर्षांचे आजोबा! काय आहे जपानमधील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य?

SCROLL FOR NEXT