Colleges started in the city without the permission of the Commissioner 
नागपूर

आयुक्तांच्या परवानगीशिवाय शहरात महाविद्यालये सुरू; म्हणे शासन निर्णयात प्रतिबंधित क्षेत्र म्हटले आहे

मंगेश गोमासे

नागपूर : राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ३ फेब्रुवारीला शासन निर्णय काढून १५ फेब्रुवारीला सर्व विद्यापीठांतील महाविद्यालये सुरू करण्याचे निर्देश दिले. मात्र, स्थानिक प्रशासनाची मान्यता घेणे आवश्यक करण्यात आले होते. मात्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विद्यापीठांतर्गत महाविद्यालये सुरू करण्याबाबत कुठलीच परवानगी घेतली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विद्यापीठाद्वारे ९ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचे मान्य केले. यानुसार १२ फेब्रुवारीला अधिकृत परिपत्रक काढून परस्पर सोमवारपासून (ता. १५) ५० टक्के विद्यार्थ्यांच्या क्षमतेने महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.

मात्र, राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे काढण्यात आलेल्या शासन निर्णयात कोरोना प्रादुर्भाव असलेल्या ज्या जिल्हा, शहर आणि नगरपालिका क्षेत्रात महाविद्यालये सुरू करायची असतील, त्या क्षेत्रातील स्थानिक पातळीवर आरोग्याची पूर्तता व पायाभूत सुविधा विचारात घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.

राज्यात अद्याप आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्याने त्यासाठी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांची परवानगी घेणे गरजेचे आहे. मात्र, याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारची मान्यता घेण्यात आल्याचे दिसले नाही.

विशेष म्हणजे, स्वतःच्या विभागात राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीनुसार महाविद्यालयांची स्वच्छता, निर्जंतुकीकरणासोबतच थर्मामीटर, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, जंतुनाशक, साबण, पाणी उपलब्ध करून द्यायचे असताना, विद्यापीठाच्या विभागात अशी कुठलीच सोय करण्यात आली नाही. विशेष म्हणजे, शहरात दररोज कोरोना रुग्ण वाढत असताना विद्यापीठाकडून या निर्देशाचे पालन करताना कसूर करण्यात आल्याचे दिसून आले. 

सामान्य प्रशासन विभागाला विचारावे लागेल
विद्यापीठाने अशा प्रकारची परवानगी घेतल्‍याचे माझ्या निदर्शनात नाही. याबाबत सामान्य प्रशासन विभागाला विचारावे लागेल. 
- राधाकृष्णन बी.,
आयुक्त, नागपूर महानगरपालिका

शासन निर्णयात प्रतिबंधित क्षेत्र म्हटले आहे
विद्यापीठाला अशी मान्यता घेण्याची आवश्यकता नाही. शासन निर्णयात प्रतिबंधित क्षेत्र असे म्हटले आहे. नागपूर सध्या कुठल्याही प्रतिबंधित क्षेत्रात मोडत नाही. 
- डॉ. अनिल हिरेखण,
प्रभारी कुलसचिव

हे आहेत हॉटस्पॉट

  • खामला
  • स्वावलंबीनगर
  • जयताळा
  • अयोध्यानगर
  • न्यू बिडीपेठ
  • वाठोडा
  • दिघोरी
  • जरीपटका
  • जाफरनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT