Devendra-Fadnavis e sakal
नागपूर

निवडणूक शपथपत्र : फडणवीसांविरोधात तक्रार, साक्ष नोंदणी प्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : निवडणूक शपथपत्रातील गुन्हा लपविल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadnavis) यांना अद्यापही दिलासा मिळाला नाही. याप्रकरणी नागपूर जिल्हा न्यायालयात साक्ष आणि पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्याविरूद्ध दाखल दोन गुन्ह्यांची माहिती दडपून ठेवली, अशी तक्रार सतीश उके यांनी केली होती. सत्र न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया करण्याचा आदेश दिला. त्या आदेशाला फडणवीस यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावेळेस उच्च न्यायालयाने उके यांची तक्रार फेटाळून लावली होती. त्या निर्णयाला उके यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश दिला. त्यानुसार डिसेंबर २०१९ मध्ये पुन्हा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी फौजदारी प्रक्रिया सुरू करून फडणवीस यांना समन्स बजावला. परंतु तीनदा फडणवीस यांनी न्यायालयाला अनुपस्थित राहण्याची परवानगी मागितली. ती मंजूर झाली होती. मात्र, तक्रारकर्त्याने त्यावर आक्षेप घेतला होता. आता परत याप्रकरणी नागपूर जिल्हा न्यायालयात साक्षी आणि पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया येत्या ३० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: सोशल मीडियावरील TRP ला तुमचे यश समजण्याची चूक करू नका; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा कुणाला सल्ला?

PM Narendra Modi On Paper Leak : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! पेपरफुटीच्या प्रकरणांची फास्ट ट्रॅक कोर्टात होणार सुनावणी

Ujani Dam: उजनी धरणातील आवक १२,७९७ क्युसेकवर; उपयुक्त पाणीसाठा ५४ टक्के, धरणातून ५,५७० क्युसेक विसर्ग कायम

Latest Marathi Update : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी जंतर-मंतरवर दाखल

Navi Mumbai Crime: उलवेत विकृतीचा कळस! तरूणांकडून दोन श्वानांवर अत्याचार, प्राणीप्रेमींमध्ये संताप

SCROLL FOR NEXT