Kirit Somaiya News Updates sakal
नागपूर

नागपूर : किरीट सोमय्या विरोधातील तक्रार फेटाळली

प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी लोंढे यांची तक्रार फेटाळली

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेला आरोप बिनबुडाचा असल्याचा दावा करीत लोंढे यांनी त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा केला होता. यात मानहानीची सांकेतिक रक्कम ही १ रुपया इतकी ठेवण्यात आली होती. तसेच सोमय्यांविरुद्ध फौजदारी कारवाईसुद्धा व्हावी, अशी मागणी लोंढे यांनी केली होती. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी लोंढे यांची ही तक्रार फेटाळली.(Complaint Rejected Against Kirit Somaiya)

लोंढेंनी त्याचे वकील सतीश उके यांच्यामार्फत सोमय्या यांच्याविरुद्ध दिवाणी आणि फौजदारी अशा दोन याचिका दाखल केल्या आहेत. या प्रकरणी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी सुषमा गवळी यांच्या समक्ष सुनावणी झाली. दाखल केलेल्या या याचिकांनुसार, सतत खोट्या आरोपांची राळ उडवून महाविकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम सोमय्या करीत आहेत. टीका करताना त्यांचा तोल ढळतो. यामुळे काँग्रेस पक्षाची नाहक बदनामी होत आहे. स्वतःच तपास अधिकारी व स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भावात ते बोलतात. मात्र, त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे काँग्रेसची बदनामी केल्याने त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी तसेच मानहानी केल्यामुळे १ रुपयाचा दंड ठोठावण्यात यावा, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.(Kirit Somaiya News Updates)

यातील फौजदारी तक्रार फेटाळून लावण्यात आली आहे. या तक्रारीतील आरोप निश्चित स्वरूपाचे नाहीत. त्यात स्पष्टता नाही. सोमय्यांच्या वक्तव्यात कुणा एका व्यक्तीविरुद्ध आरोप झालेले नसल्याने त्यामुळे कोणाची बदनामी होणे, जाणीवपूर्वक अपमान होणे किंवा कोणाला धमकी देणे हे घटक नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४९९, ५०३, ५०४ व ५०५ (i) नुसार कारवाई होऊ शकत नाही, असे सांगत न्यायालयाने ही तक्रार फेटाळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT