नागपूर

काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी; भाजप, शिवसेनेचा एकला चलो रे

नीलेश डोये

नागपूर : जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी (Zilla Parishad elections) कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी झाली (Congress and NCP will fight together) आहे. कॉंग्रेस १० तर राष्ट्रवादी कॉंग्रेस ५ जागा लढणार आहे. एक जागा शेकापला देण्यात आली आहे. भाजपने १६, शिवसेनेने १० तर वंचित बहुजन आघाडीने ११ जागांवर उमेदवार दिले आहेत. (Congress-and-NCP-will-fight-together-in-Zilla-Parishad-elections)

१६ जागांमध्ये ७ कॉंग्रेस, ४ राष्ट्रवादी, एक शेकाप तर ४ जागा भाजपकडे होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने या पोटनिवडणुका होत आहे. मागील निवडणूकही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीकडून लढली होती. यात कॉंग्रेसच्या वाट्याला १० राष्ट्रवादीकडे ५ व १ जागा शेकापकडे होती. या निवडणुकीत आघाडी होणार नसल्याची चर्चा होती. परंतु, गेल्या निवडणुकीचा फार्मुला कायम ठेवण्यात आला.

विशेष म्हणजे महाविकासआघाडीचा घटक असलेल्या शिवसेनेने दोन जागांचा प्रस्ताव दिला होता. परंतु, तो नाकारण्यात आला. त्यामुळे शिवसेने एकट्याने लढण्याचा निर्णय घेत १० जागी उमेदवार दिले. त्याचा आघाडीला फायदा होतो की तोटा हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. तर किमान एक उमेदवार निवडून येण्याचा दावा पक्षाकडून करण्यात येत आहे. भाजपने सर्व १६ ही जागी उमेदवार उभे केले. वंचित बहुजन आघाडीनेही सर्व ११ ठिकाणी उमेदवार दिले.

यामुळे होत आहे निवडणुका

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवर गेली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केले. ओबीसी वर्गातून निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करीत सर्व जागा खुल्या वर्गातून भरण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे १६ जिल्हा परिषद व ३१ पंचायत समित्यांच्या जागांसाठी निवडणुका होत आहे.

शिवसेनेकडे सर्व जागेवर निवडणूक लढण्यासाठी उमेदवार नव्हते तर आघाडीला समर्थन देण्याची गरज होती.
- संजय झाडे, जि. प. सदस्य, शिवसेना

सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

ही निवडणूक पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Congress-and-NCP-will-fight-together-in-Zilla-Parishad-elections)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! आता प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार होणार; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; एका क्लिकवर मिळणार ३ लाख शिक्षकांचा बायोडाटा

Panchang 24 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 मार्च 2026

Pune News: औषधोपचाराने ‘एमडीआर’ क्षयरोगावर मात; मृत्युदर घट, बरे होण्याचे प्रमाण वाढले

इनर इंजिनिअरिंग : आपल्यातील सर्वोच्च शक्ती

SCROLL FOR NEXT