congress leader not active for nagpur municipal corporation election 2022
congress leader not active for nagpur municipal corporation election 2022 
नागपूर

काँग्रेस नेते अद्यापही 'होम क्वारंटाइन', कार्यकर्ते अस्वस्थ; महापालिका पुन्हा भाजपच्या ताब्यात?

राजेश चरपे

नागपूर : भाजप महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागली असताना काँग्रेसचे नेते अद्याप 'होम क्वारंटाईन'मधून बाहेर पडायला तयार नसल्याने कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. असेच सुरू राहिले तर पुन्हा महापालिका भाजपच्या ताब्यात राहील असे आता बोलले जात आहे. 

तब्बल पंधरा वर्षांपासून महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकत आहे. चारच्या प्रभागामुळे भाजपचे चांगलेच फावले होते. १०८ नगरसेवक निवडून आले असल्याने भाजप तशी बिनधास्त होती. मात्र, भाजपला अँटी इन्कंबसीचा धोका निर्माण झाला आहे. चारचा प्रभाग असल्याने निम्मे नगरसेवक घराच्या बाहेरच पडत नाही. त्यात करोना आणि निधीच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणात भाजप नगरसेवकांविषयी नाराजी आहे. भाजपचे केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणातून ही बाब समोरसुद्धा आली आहे. त्यामुळे सावध झालेल्या भाजपने आत्तापासून नवीन गडी हेरायला सुरुवात केली आहे. प्रभागात बऱ्यापैकी वर्चस्व व नाव असलेल्यांना भाजपसोबत जोडल्या जात आहे. दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने काँग्रेसला मुसंडी मारण्याची शहरात मोठी संधी असल्याचे चित्र आहे. त्यातच चारचा प्रभागाचा निर्णय बदलण्यात आला आहे. एकल वॉर्ड काँग्रेसला फायदेशीर ठरतो हा इतिहास आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या गटागटात विखुरलेल्या तसेच नाराज असलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्रित आणण्याची गरज आहे. मात्र, याकडे कोणीच लक्ष देत नाही. 

प्रदेशाध्यक्षांची प्रतीक्षा - 
नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर संघटनेत मोठे फेरबदल होतील, काही नव्या दमाच्या तरुणांना जबाबदारी सोपवली जाईल तसेच आपसातील गटबाजी व मतभेद दूर करतील अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र तसे काहीही होताना दिसत नाही. पटोले यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात बैठक घेतली. सर्व नेत्यांना एकत्रित बोलावले. प्रत्येकाचे म्हणणे जाणून घेतले. मात्र, राज्याच्या उपराजधानीत अद्याप त्यांनी कामाला सुरुवात केलेली नाही. विशेष म्हणजे पटोले यांनी नागपूरमधून लोकसभेची निवडणूक लढली आहे. त्यामुळे बहुतांश नेत्यांचा त्यांचा आधीच संपर्क झालेला आहे. कोण कामाचे, कोणी नाही याची त्यांना बारकाईने माहिती आहे. बेधडक स्वभावाचे नाना नागपूरपासून दोन हात लांब असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच पुन्हा उमेदवारी दाखल करायच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघायची काय असेही बोलू लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT