Consolation to property buyers, half of stam duty 
नागपूर

मोठी बातमी : घर खरेदीच्या प्रयत्नात असलेल्यांना मिळणार दिलासा, वाचा सविस्तर

नीलेश डोये

नागपूर  : मालमत्ता खरेदी करण्याच्या बेतात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. खरेदी-विक्री व्यवहारावर लागणारी स्टॅम ड्युटी (मुद्रांक शुल्क) कमी करण्यात आले आहे. शहरी भागात तीन तर ग्रामीण भागात फक्त दोन टक्केच स्टॅम ड्युटी लागणार आहे. एक सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होतील. यामुळे घर खरेदीच्या प्रयत्नात असलेल्यांना मोठा दिलासा मिळाला असून, यामुळे घराचे स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे. रिअल इस्टेटच्या व्यवसायालाही गती येणार असल्याचे बोलले जात आहे.

कोरोनामुळे अनेक उद्योग बंद पडले, रोजगारावर संकट आले. याचा थेट परिणाम अनेकांवर झाला. नोटबंदी आणि जीएसटीमुळेही मोठा परिणाम या रिअल इस्टेटच्या व्यवसायावर झाला आहे. लोकांच्या हातात पैसे नसल्याने लोकांनी घर घेण्यापासून फारकत घेतली. रेडीरेकनरचे दरही जास्त असल्याचा परिणाम जाणवत होता.

त्यामुळे गेल्या दोन वर्षात रेडीरकनरच्या दरात फारशी वाढ करण्यात आले नाही. यंदातर रेडीरेकनरचे दर जैसे थे ठेवण्यात आले होते. परंतु, त्यानंतरही रिअल इस्टेटच्या व्यवसायात फारशी तेजी आली नाही. त्यामुळे आता सरकारने स्टॅम ड्युटीस आणखी घट करण्याचा निर्णय घतला. यानुसार दोन टक्के स्टॅम ड्युटी तर एक टक्का अधिभार कमी करण्यात येणार आहे. एक सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होतील.

नागपूरमध्ये असे असतील दर


नागपूर शहरात पूर्वी सर्वाधिक जास्त स्टॅम ड्युटी लागत असे. महाविकास आघाडी सरकारने मेट्रोचा एक टक्का कमी केला. एनआयटीच्या नावे आकरण्यात येणारा शुल्कही कमा केला. सध्या ६ टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येत आहे. यात एक टक्का एलबीटीचा आहे. आता तीन टक्केच शुल्क आकारण्यात येईल. तर ग्रामीण भागात पाच टक्के शुल्क आकारण्यात येत असून, आता फक्त दोन टक्केच स्टॅम ड्युटी लागेल. हे दर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत असणार आहे. एक जानेवारीपासून यात एक टक्का वाढ करण्यात येणार आहे. 

संपादित ः अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : तुळजापूरमध्ये पोलिस आणि भाविकांमध्ये वाद

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT