नागपूर

भाजप-काँग्रेसमध्ये वाद; बोलू दिले जात नसल्याने आमदारांमध्ये वादावादी

राजेश चरपे

नागपूर : क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार (Sports and Animal Husbandry Minister Sunil Kedar) मतदारसंघातील सरकारी बैठकांमध्ये बोलू देत नाही. बोलण्याचा प्रयत्न केल्यास अपमानास्पद वागणूक देतात. यामुळे कामठी विधानसभा मतदारसंघाचे आमदार टेकचंद सावरकर (MLA Tekchand Savarkar) चांगलेच भडकले आहेत. आता आपण गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. (Controversy-among-MLAs-as-they-are-not-allowed-to-speak-in-Nagpur)

लॉकडाउन खुलल्यानंतर नामदार केदार यांनी मौदा व कामठी तालुक्यातील रखडलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी बैठक बोलावली होती. कामठी मतदारसंघाचे आमदार सावरकर आहेत. यावेळी रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, माजी अध्यक्ष सुरेश भोयर, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, मुख्याधिकारी योगेश कुंभेजकर, सभापती तापेश्वर वैद्य, नेमावली माटे, उज्वला बोढारे, भारती पाटील, सरपंच, प्रशासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सावरकर यांच्यासाठी आठव्या क्रमांकावर खुर्ची ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्यांचा पारा आधीच वाढला होता. मंत्र्यांचे दोन विषय आटोपल्यावर सावरकर यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना बोलू देण्यात आले नाही. त्यामुळे निषेध नोंदवून ते बैठकीतून निघून गेले. यापूर्वीसुद्धा केदार यांनी घेतल्या बैठकीला सावरकरांना बोलावण्यातच आले नव्हते. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावरून नाराजी जाहीर केली होती. यावेळी बैठकीला बोलावले मात्र पहिल्या जिल्हा परिषदेच्या सभापतींच्या नंतर त्यांची खुर्ची ठेवली होती.

सुनील केदार दादागिरी करतात. आमदार या नात्याने सरकारी बैठकांना बोलावणे आपणास प्रोटोकॉलनुसार आवश्यक आहे. सरकारी बैठका पक्षाच्या नसतात. मात्र, त्यांना विरोधकांचा राग आहे. आमचे बोलणेही आवडत नाही. आमदार म्हणून आपण पहिल्यांदा निवडून आलो असलो तर जिल्हा परिषदेत आपण सातवेळा निवडून आलो आहो. यापुढे आपण शांत बसणार नाही.
- टेकचंद सावरकर, आमदार, कामठी विधानसभा

(Controversy-among-MLAs-as-they-are-not-allowed-to-speak-in-Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Play Off Scenario: गुजरात टायटन्सचा सलग पाचवा विजय! सनरायझर्स हैदराबादला नमवून POINT TABLE मध्ये अव्वल, अनपेक्षित कलाटणी

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सच्या संघात बदल... प्ले ऑफच्या शर्यतीसाठी मिळालं बळ... पुण्याच्या रामकृष्ण घोषच्या जागी एन्ट्री

Triple Accident : रजापूर शिवारात तिहेरी अपघात; वाळू वाहतूक करणारा हायवा पलटी, दोन कारची धडक, चार ते पाच जण किरकोळ जखमी

Amit Satam: पंतप्रधानांच्या 'इंधन बचती'ला मुंबई भाजपचा हरताळ; अमित साटम यांचा २५ गाड्यांचा 'शाही' ताफा वादाच्या भोवऱ्यात!

GT vs SRH Live : टप्पा खाऊन आऊट... अभिषेक शर्मा विचित्र पद्धतीने बाद झाला, कागिसो रबाडाला हसू आवरेना... Video Viral

SCROLL FOR NEXT