aiims 
नागपूर

एम्स'मध्ये स्क्रिनिंगसाठी "कोरोना कार्नर'

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जगभर धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूने नागपुरसह विदर्भात दस्तक दिली. सध्या विदर्भात सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे प्रशासनाने खबरदारीचे सर्व उपाय सुरू केले आहेत. संसदेत नुकतेच केंद्रींय आरोग्य मंत्र्यांनी नागपूरच्या एम्समध्ये बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. या पार्श्‍वभूमीवर एम्समध्ये संपर्क साधला असता येथे "कोरोना कार्नर' सुरू करण्यात आला असून येथे रुग्णांचे स्क्रिनिंग करण्यास सुरूवात झाली आहे.

कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या नागपुरात वाढत असताना कोरोनावर औषधोपचार नसल्यामुळे प्रतिबंध हाच सर्वात अधिक प्रभावी असा मार्ग आहे. ही बाब लक्षात घेत एम्समध्ये येणाऱ्या रुग्णांचे स्क्रिनिंग करताना विदेशी प्रवासाची पार्श्‍वभूमी असलेल्यांची चाचणी करणे आवश्‍यक आहे. सध्या दर दिवसाला एम्समध्ये सर्व विभागात तीनशे ते चारशे रुग्णांची नोंद बाह्यरुग्ण विभागात होते. यातील विदेशी प्रवास केलेला असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना तत्काळ कोरोना कार्नरमध्ये असलेल्या डॉक्‍टरांच्या पथकाकडून स्क्रिनिंग करण्यात येते. कोरोनाची लक्षणे असल्यानंतरच नमूने घेण्यात येतात. ही चाचणी सामान्यांच्या आवाक्‍यात नाही. यामुळे ही लक्षणे आढणाऱ्या सर्वांची चाचणी करणे शक्‍य नाही. केवळ विदेशी प्रवासाचा इतिहास असल्यास त्यांचे नमुने घेण्यात येतात. इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) काही नमूने पाठविण्यात आले असल्याची माहिती मेयोतून प्राप्त झाली.

प्रतिबंध हाच उपाय
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी "एम्स'च्या वतीने जनजागृती सुरू आहे. प्रतिबंध हाच महत्वाचा यावर उपाय असून यासंदर्भातील समुपदेशन येथील डॉक्‍टरांकडून करण्यात येते. याशिवाय स्क्रिनिंग करण्यात येत आहे. हा आजारच होवू नये म्हणून प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक कार्यक्रम, सिनेमासह गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. आवश्‍यक ती काळजी घ्यावी.
डॉ. विभा दत्ता, संचालक, एम्स, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Weather Alert : पुढचे ८ दिवस इशारा! पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस, विदर्भात उष्णतेची लाट; शेतकऱ्यांना कृषी विभागाचा महत्त्वाचा सल्ला

रुपया पुन्हा घसरला! सार्वकालिक नीचांकी पातळीवर, ७९ पैशांनी कोसळून ९५.२८ वर

IPL 2026: हैदराबाद-गुजरातमध्ये प्लेऑफ निश्चित करण्यासाठी हातघाईची लढाई; कशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन?

Maharashtra Employees DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा; महागाई भत्त्यात वाढ, १ जानेवारीपासूनचा फरक मिळणार

Nida Khan: निदा खानला १४ दिवसांची कोठडी; एसआयटीकडून आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास सुरू, ‘पॉश’ कायद्याचे उल्‍लंघन..

SCROLL FOR NEXT