Corona in the office of the Deputy Director of Health 
नागपूर

आरोग्य उपसंचालक कार्यालयात कोरोना

सकाळ वृत्तसेवा

शिपायांची संख्या अधिक; १८ कर्मचारी बाधित 

नागपूर : आरोग्य उपसंचालक कार्यालयात पंधरा दिवसांपूर्वी कोरोनाच्या बाधेने हंसराज बारसागडे या शिपायाचा मृत्यू झाला. मात्र, त्यांना कोविड योद्धा म्हणून घोषित करण्यात आले नाही. कोणतीही नुकसान भरपाई दिली गेली नसल्याची माहिती पुढे आली आहे. तर, नुकतेच दोन दिवसांमध्ये नागपूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयातील १८ जण कोरोनाच्या विळख्या सापडले आहेत. विशेष असे की, या कर्मचाऱ्यांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोणतीही संरक्षण प्रणाली दिली गेली नाही. 

पूर्व विदर्भाचे हे मुख्यालय आहे. येथे दर दिवसाला नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यातून आरोग्य कर्मचारी येतात. त्यांच्या संपर्कात माता कचेरी येथील कर्मचारी येतात. त्यांच्या संरक्षणासाठी ना मास्क, ना किट अशी अवस्था आहे. विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्यासोबतच्या आरोग्य उपसंचालकांच्या बैठकीत आरोग्य कर्मचारी मोठ्या प्रमाणात असतात. मात्र, त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या कार्यालयात पाहिजे ती संरक्षण प्रणाली तयार केली नाही. यामुळे येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला असल्याची जोरदार चर्चा पसरली आहे. विशेष असे की, प्रवेशद्वारावर असलेले शिपाई अधिक प्रणाणात कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. मागील दोन दिवसांमध्ये ९० जणांची आर-टी पीसीआर चाचणी करण्यात आली. यात १८ जण बाधित आढळले आहेत. 

चहावाल्या बाई बाधित 
आरोग्य विभागात सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना चहा बनवून त्यांच्या टेबलवर चहा नेऊन देणाऱ्या चहावाल्या बाईंना कोरोनाची लागण झाल्यामुळे आरोग्‍य उपसंचालक कार्यालय हादरले आहे. या चहावाल्या बाईंचा सर्व कर्मचारी, अधिकारी यांच्याशी दर दिवसाला संपर्क येत होता. यामुळे प्रत्येक कर्मचारी तपासणीसाठी पुढे आला आहे. विशेष असे की, ज्या कर्मचाऱ्यांचा या चाचणीत निगेटिव्ह अहवाल आला आहे, ते दहशतीत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताची बॅट पडणार पाकिस्तानला भारी! एका छोट्या शहराची मोठी ओळख! मेरठ कसे बनले जगाचे क्रिकेट बॅट हब?

Mathura Kusum Sarovar : गोवर्धन परिक्रमेतील 'गुप्त खजिना'; कुसुम सरोवराच्या खोलीचे रहस्य आजही कायम! वृंदावन-गोवर्धन फिरताना हे ठिकाण नक्की पहा

E-Pik Pahani: १५ जुलैपासून राज्यभर नियुक्त सहायकांकडून ई-पीक पाहणी; तांत्रिक अडचणी दूर होऊन सातबारा उताऱ्यावरील नोंदी सुलभ

Water Supply : राज्यात बाराशे टँकरद्वारे पाणीपुरवठा

Pune News : पुणे स्थानकावर ९ तासांचा ब्लॉक; पाच जुलैला डेक्कन एक्स्प्रेससह अनेक गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT