corona  PASIEKA
नागपूर

बेड मिळत नसल्यानं होताहेत रुग्णांचे मृत्यू; नागपुरात दर दिवसाला वाढीव ६०० खाटांची गरज

सकाळ डिजिटल टीम

नागपूर ः जिल्ह्यात कोरोना महामारीने आता भयंकर रूप धारण केले असून शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये जागाच उपलब्ध नाही. परिणामी घरी उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची प्रकृती ढासळल्यानंतर त्यांना बेड उपलब्ध होत नाही. अशा अनेक रूग्ण उपचाराअभावी दगावत असल्याचे चित्र सर्वत्र आहे.

रवींद्र अग्रवाल या साठ वर्षाच्या कोरोना रुग्णाला बेड न मिळाल्याने मृत्यूला सामोरे जावे लागले. अग्रवाल यांचा बेसा पिपला रोडवर स्वतःचा फ्लॅट. कोरोना झाल्याने त्यांची प्रकृती ढासळली. पहाटे सहा वाजता रुग्णवाहिकेतून शहरातील आठ ते दहा रुग्णालये पालथी घातली, मात्र खाट मिळाली नाही. अखेर घराच्या दिशेने रुग्णवाहिका निघाली. रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. महापालिकेला कळवल्यानंतर शववाहिका मात्र लगेच आली पण तोवर उशीर झाला होता. कोरोनाबाधितांना खाटेसाठी भटकंती करताना जीव सोडावा लागत असल्याचे विदारक वास्तव पुढे आले आहे.

दिवसाला सहा ते साडेसहजार कोरोनाबाधित आढळून येत असून यातील १० टक्के रुग्ण गंभीर असतात. यामुळे दर दिवसाला ६०० खाटांची गरज आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मेडिकलमध्ये ६००, मेयोत ५५० खाटांची सोय होती. मात्र रुग्णांची संख्या अचानक वाढल्यामुळे मेडिकलमध्ये ३०० तर वाढवण्यात आल्या. आता मेडिकलमध्ये ९०० तर मेयोत ३० खाटा वाढून तेथील खाटांची संख्या ५८० वर पोहचली आहे. उपलब्ध खाटांपैकी २०० ते २५० खाटांवर संशयित व सारीच्या रुग्णांना ठेवले जाते.

चाचणीतील अहवालानंतर हे रुग्ण वेगवेगळ्या ठिकाणी हलवले जातात. मेडिकलला आणखी १०० खाटा वाढवणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले होते. परंतु मेडिकलकडून जिल्हा प्रशासनाला आता अतिरिक्त मनुष्यबळ मिळत नसल्यामुळे खाटा वाढवणे अशक्य आहे. मिहान परिसरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये २०० खाटा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. तसे उद्घाटन झाले. येथील मदत केंद्रावर फोन केला असता, कॅन्सर असलेल्या कोरोनाबाधितांना प्राधान्य असून येथील सर्व १०० खाटा फुल्ल असल्याचे सांगण्यात येते.

विमाधारकांची भटकंती

कोरोनाबाधित अहवाल आल्यानंतर तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी अनेक जण जात आहेत. मात्र विमाधारक असलेल्यांना खासगी रुग्णालयात खाट मिळत नाही. आरोग्य विमाधारकांना रुग्णालयात खाट उपलब्ध होत नाही. यामुळे विमा काढूनही खाट मिळत नाही. विमाधारकांची ही परवड होत असल्याचे चित्र प्रत्येक खासगी रुग्णालयात दिसून येत आहे. विशेष असे की, ज्या विमा कंपनीसोबत करार केला आहे, ती रुग्णालये देखील विमाधारकांना आधी रोख भरा, नंतर बघू असे सांगत असल्याची तक्रार एका विमाधारकाने केली आहे.

मेयो, मेडिकलमधील खाटां

-मेडिकल ९००

-मेयो ५८०

-एम्स - २००

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT