कामठीः कोरोना रुग्णांची चाचणी झाल्यानंतर उघडयावर फेकलेले साहित्य. 
नागपूर

बापरे! वापरलेल्या पीपीई किट व साहित्यावर खुद्द प्रशासन पसरवतेय कोरोना...

सतिश डहाट

कामठी (जि.नागपूर) : कोरोना महामारीच्या काळात सध्या स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाला महत्व दिले जात आहे. परंतू या कृतीला कामठी नगर पालिकेमध्ये मात्र छेद दिला जात आहे. सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने कामठी तालुक्यात चांगलाच जोर धरला असून प्रशासन हा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी सज्ज असली तरी प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षितामुळे खुद्द प्रशासनच कोरोनाचे निमंत्रण देत असल्याची निष्काळजीपणाची एक घटना नुकतीच उघडकीस आली.

अधिक वाचाः कोळसा ट्रक उलटून चालकाचा मृत्यू, आता वेकोलि प्रशासनावर होताहेत हे आरोप…

 दवाखान्यातील कचरा उघडयावर?
कामठी आजनी मार्गावर असलेल्या घनकचरा व्यवस्थापन मार्गाच्या बाजूला कोरोना तपासणी चाचणी केलेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट किट, वापरण्यात आलेली  पीपीई किट, हॅन्डग्लोज, ड्रेसिंग पट्ट्या, इंजेक्शन सोमवारी दुपारी एकच्या दरम्यान एका दवाखान्यातील वाहनामार्फत धोबी नाल्यात फेकण्यात आलेला कामठी येथील दवाखान्यातील कचरा. यात इंजेक्शन, ड्रेसिंग पट्ट्या आणि पिपी ई किटसुध्दा असू शकतात. हे निरूपयोगी साहित्य उघड्यावर फेकण्यात आले होते, तर कित्येक नागरिक या फेकलेल्या निरूपयोगी कोरोना चाचणी साहित्यावरून ओलांडून जात होते. या मार्गावरून  मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांसाठी ही बाब  धोकादायक आहे.  तसेच एका खासगी कोविड रुग्णालयाच्यावतीने केलेल्या कोरोना तपासणी केलेल्या निरुपयोगी साहित्यचा साठा एका वाहनातून वाहतुक करून घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या नाल्यात टाकल्याचे आढळून आले. या प्रकाराची वार्ता आजनीवासींना मिळताच आजनी ग्रामस्थांनी त्वरित या प्रकाराला आळा बसावा, यासाठी या वाहनाला घेराव घातला. हा प्रकार बंद करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या  प्रकारामुळे आजनीवासींचे आरोग्य धोक्यात आले असून खुद्द प्रशासन आजनी ग्रामवासींना कोरोनाचे निमंत्रण देत असल्यावरून आजनीवासींमध्ये प्रशासनाविषयी नाराजगीचा सूर ऐकायला येत आहे.

अधिक वाचाः महिला, बालकल्याण विभागात बदल्यांचा घोळ, काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष
डंपिंग यार्डचा कचरा आजनी गादा रोडवर टाकत असल्यामुळे गावातील विद्यार्थी तसेच नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. कामठी नगरपालिका प्रशासनाकडे अनेकवेळा यासंदर्भात पत्रव्यवहार केला, परंतू पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
 सुनिल मेश्राम
सरपंच, आजनी

संपादन  : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup : एका राजाने निवडला संघ... खेळाडूंवरील गुन्हे माफ अन् इंग्लिश तेल कंपनी बंद पाडण्याची धमकी; १९३० च्या वर्ल्ड कपचा रंजक किस्सा तुम्ही ऐकला नसेल...

Donald Trump Team Split: इराण करारावरून ट्रम्प यांच्या प्रशासनात फूट; सीआयएच्या गुप्त अहवालामुळे अमेरिकेची उडाली झोप

Broiler Chickens Death : एका रात्रीत पोल्ट्रीमधील सुमारे 3600 बॉयलर कोंबड्यांचा अचानक मृत्यु; सुमारे सात लाखाचे नुकसान, उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज

Jawan Pravin Avhade : कन्यारत्नाच्या आनंदावर विरजण; जवान प्रवीण आव्हाड यांचे अपघाती निधन

Bhiwandi: भिवंडी महापालिकेच्या २४ उमेदवारांना नोटीस, निवडणुकीचा हिशोब न दिल्याने कारवाई

SCROLL FOR NEXT