corona test compulsory for traveler come in nagpur 
नागपूर

प्रवाशांनो, कोरोना चाचणी निगेटिव्ह असेल तरच नागपुरात प्रवेश!

राजेश प्रायकर

नागपूर : शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. या चाचणीमध्ये निगेटिव्ह आल्यास जिल्ह्यात प्रवेश मिळणार आहे.

परराज्यातून विमानाने येणाऱ्या नागरिकांना ७२ तासांपूर्वी चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. रेल्वेसाठी हीच अट ९६ तासांची आहे. आज ५ नोव्हेंबरपासून नव्या मार्गदर्शक सूचना लागू होणार आहेत. आयुक्तांनी विमानतळ प्राधिकरणालाही विमानतळ परिसरात चाचणी केंद्र सुरू करण्याच्या सूचना केल्या आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनीही जिल्ह्यात प्रवेशासाठी आदेश काढले. राज्य सरकारने प्रत्येक जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना राज्यात, शहरात प्रवेश करणाऱ्यांसंबंधी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्याचे निर्देश दिले आहेत. आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आज यासंबंधात आदेश काढले. दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा येथून नागपुरात येणाऱ्या नागरिकांना ७२ तासांपूर्वी आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याचा पुरावा दाखवावा लागणार आहे.

पुरावा असेल तरच शहरात प्रवेश मिळणार आहे. चाचणीचा अहवाल नसलेल्यांना विमानतळावरच स्वखर्चाने चाचणी करावी लागणार आहे. चाचणीच्या वेळी विमानतळ अधिकाऱ्यांना प्रवाशांचा पत्ता, फोन क्रमांक आदी माहिती घ्यावी लागणार आहे. चाचणी केल्यानंतर प्रवासी घरी किंवा त्यांच्या गंतव्य ठिकाणी जाऊ शकतील. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास विमानतळावरील चाचणी केंद्रातील कर्मचारी प्रवाशाला कळवतील. त्यानंतर त्यांना कोरोनासंबंधी उपचार घ्यावे लागणार आहे. रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांसाठी ९६ तासांपूर्वी निगेटिव्ह आल्याचा अहवाल दाखवावा लागणार आहे. ज्यांच्याकडे अहवाल नसेल त्यांची स्क्रिनिंग केली जाईल. त्यांच्यात लक्षणे आढळून आल्यास तत्काळ अ‌ॅन्टीजेन टेस्ट करण्यात येईल. ही चाचणी निगेटिव्ह आली तर प्रवाशांना घरी जाण्याची मुभा असेल. मात्र, पॉझिटिव्ह आल्यास कोविड केअर सेंटरमध्ये रेल्वे स्टेशनवरूनच रवानगी केली जाईल. 

जिल्ह्याच्या सीमा तपासणी नाक्यावर चाचणी -
महामार्गाने जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची जिल्ह्याच्या सीमा क्षेत्र तपासणी नाक्यावर चाचणी केली जाईल. लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तीची अ‌ॅन्टीजेन टेस्ट केली जाईल. निगेटिव्ह अहवाल आल्यास शहर, जिल्ह्यात प्रवेश देण्यात येईल. मात्र, पॉझिटिव्ह आढळून आल्यास कोविड केअर सेंटरला पाठविण्यात येईल. सावनेर, नरखेड, रामटेक या रस्ते मार्गाने नागपूर जिल्ह्यात दाखल होणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा क्षेत्रावर तपासणी चौकी तयार करण्याचे देखील निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT