coronavirus sakal
नागपूर

३५० पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना; दररोज ३५ जणांना लागण

३५० पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली

मंगेश गोमासे

नागपूर : शहरात कोरोनाच्या (coronavirus) विळखा वाढत चालला आहे. त्यामुळे सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत हे. त्यातूनच हा विळखात पोलिस खातेही आले असून आतापर्यंत शहरातील जवळपास ३५० पोलिस (police) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

कोरोनाच्या (coronavirus) संक्रमणात दिवसेंदिवस दुपटीने वाढ होत आहे. याशिवाय ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शहरात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. त्यामध्ये पोलिसांचा संपर्क सामान्यांशी येत असल्याने पोलिसांमध्ये संक्रमण अधिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच दररोज ३० ते ३५ पोलिसांना (police) कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आतापर्यंत ३५० पोलिसांना कोरोनाची लागण झालेली आहे.

विशेष म्हणजे, यामध्ये कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे पोलिस आयुक्त म्हणाले. विशेष म्हणजे, पोलिसांकडून कोरोना (coronavirus) प्रतिबंधासाठी आवश्‍यक असलेली उपाययोजना आणि अनाउंसमेंट करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. त्यातून हॉटेल्स , बार, मॉल, लग्न सभागृहे आदी ठिकाणी पोलिसांकडून सातत्याने तपासणी करण्यात येत आहे. त्यातून १० सभागृहांना नोटीस देत त्यांच्यावर दंड ठोठावण्यात आला आहे. यापुढेही त्यांनी आदेशाचे पालन न केल्यात त्यांना सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे असे ते म्हणाले.

अग्रवाल हत्याकांडचा तपास योग्य दिशेने

मंगळवारी घडलेल्या मदन अग्रवाल परिवाराच्या हत्याकांडाचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती पोलिस (police) आयुक्तांनी दिली. याशिवाय रेकी प्रकरणात काहीही बोलण्यास नकार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT