coronavirus 
नागपूर

गुड न्युज! गुड न्युज ! गुड न्युज! कोरोनाच्या विळख्यातुन सहीसलामत

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : उपराजधानीत चार कोरोना विषाणुग्रस्त आढळल्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र मेयो आणि मेडिकलमध्ये योग्य देखभाल आणि नियोजनबद्ध उपचारातून चारही रुग्ण कोरोना विषाणुच्या विळख्यातून सहीसलामत बाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेतून आलेला रुग्ण लागणग्रस्त झाल्यानंतर आठ दिवसानंतर त्यांच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या. या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तर उर्वरित मेडिकलमध्ये भरती असलेल्या तिन्ही रुग्णांच्या पहिल्या चाचणीत निगेटिव्ह आल्या असल्याची माहिती पुढे आली आहे. शुक्रवारी या तीन रुग्णांचे नमूने पुन्हा एकदा तपासण्यात येतील. हे चारही रुग्ण कोरोना मुक्त होतील असा अंदाज आहे. आगामी 7 ते 17 दिवस डॉक्‍टरांच्या निरीक्षणात ते असतील.
कोरोना विषाणूने 11 मार्च रोजी उपराजधानीत दस्तक दिली. पहिल्या दिवशी एक नंतर पुन्हा एक तर तिसऱ्या दिवशी दोन असे लागोपाठ चार नागपूरचे तर तीन यवतमाळचे रुग्ण बाधित आढळले. यामुळे पहिल्या आठवड्यात लागणग्रस्तांची रांग लागली होती. मात्र लगेच नंतरच्या आठवड्याच्या मेडिकल, मेयोतील डॉक्‍टरांनी उपचारातून तसेच योग्य नियोजनातून या रुग्णाना धीर दिला. त्यांच्यावर उपचार केले.

नागपूर विभागातील स्थिती

  • एकूण संशयित 188
  • सध्या भरती असलेल्या व्यक्ती  5
  • एकूण भरती केलेल्या व्यक्ती  136
  • आज तपासलेले नमुने  28
  • आजवर तपासलेल नमुने  144
  • पाठपुरावा सुरु असलेल्या व्यक्ती  35
  • आज विमानतळावर स्क्रीनिंग झालेले प्रवासी  20
  • विमानतळावर एकूण स्क्रीनिंग प्रवासी  1071
  • आज विलगीकरण केलेले प्रवासी  20
  • सध्या विलगीकरण कक्षात असलेले प्रवासी  34

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT