coronavirus 
नागपूर

सावधान ! कोरोनाचा चौथा टप्पा असणार गंभीर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भारताने ज्या पद्धतीने कोरोनाचे संकट हाताळले, ते निश्‍चित कौतुकास्पद आहे. आज आपण या आजाराच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहोत. चौथा टप्पा तर खूपच गंभीर असेल. त्याला तोंड देण्याची तयारी आतापासून करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी सरकारी यंत्रणा पुरेशी नसल्यामुळे खासगी डॉक्‍टर आणि इस्पितळांना कोरोना प्रतिबंधक लढाईत सहभागी करून घेतले पाहिजे, असे मत ख्यातनाम तज्ज्ञ डॉ. पिनाक दंदे यांनी येथे व्यक्त केले.

रामदासपेठ येथील दैनिक "सकाळ'च्या शहर कार्यालयात डॉ. पिनाक दंदे यांनी कोरोना व्हायरसबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कोरोना भारतात स्टेज थ्री अवस्थेतमध्ये असून, ओव्हान चीनमध्ये हा आजार स्टेज फोरपर्यंत पसरला आहे. कोरोना आजार हा नवीन नसून पंधरा ते वीस वर्षांपूर्वीपासून हा विषाणू अस्तित्वात आहे. डिसेंबर 2019 पासून चायनामध्ये कोरोना जिवाणू मोठ्या प्रमाणात वाढल्याने, आता या जिवाणूने जगभरात हाहाकार माजविला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अथवा त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात अद्यापपर्यंत खात्रीलायक उपाययोजना उपलब्ध नसल्याने, कोरोनाच्या रूपाने राष्ट्रावर वैद्यकीय आपत्ती ओढवल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी स्वतःच आपली सुरक्षा करायची असून, वारंवार हात धुणे, गर्दीची ठिकाणे टाळणे आणि वेळीच वैद्यकीय उपचार घेणे यातूनच कोरोनाला काही प्रमाणात प्रतिबंध होऊ शकतो अन्यथा देशात वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती उद्‌भवू शकते, असे मत डॉ. दंदे यांनी व्यक्त केले. कोरोनाबाबत आपल्या देशात अनेक अफवाही पसरत असून, त्यात काहीही तथ्य नाही. राज्य शासनाने कोरोनाबाबत अधिकृत डॅशबोर्ड प्रसिद्ध केला असून, नागरिकांनी केवळ त्यावरच विश्‍वास ठेवावा. मांसाहार केल्याने, कोरोना होतो यात काही तथ्य नसून, कुठलेही अन्न शिजवून खाल्यास धोका नसल्याचे त्यांनी सांगितले.

मॅन टू मॅन संपर्क टाळावा
सरकारने आवाहन केल्याप्रमाणे नागरिकांनी सहकार्य करीत, मॅन टू मॅन संपर्क टाळला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी न जाता घरीच थांबावे. रेल्वे, बस किंवा इतर वाहनांनी प्रवास टाळावा. साबणाने वारंवार हात धुवावे. लहान मुले आणि गर्भवती स्रियांनी अधिक काळजी घ्यावी. याशिवाय मधुमेही रुग्ण, बीपी, किडनीचे आजार, हृदयाचे आजार असणाऱ्या रुग्णांनीही कोरोनाबाबत सतर्क राहावे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोषक आहार घ्यावा, असे आवाहन डॉ. दंदे यांनी केले.

खासगी रुग्णालयांनीही सहकार्य करावे
कोरोना व्हायरस जितक्‍या वेगाने पसरत आहे, तितक्‍या वेगाने वैद्यकीय यंत्रणा काम करू शकत नाही. कोरोनाची लागण आहे किंवा नाही यासाठी पीसीआर ही टेस्ट करावी लागते. त्याचा साधारण खर्च 9 ते 10 हजार असून, देशभरात केवळ 150 सेंटरवर ही चाचणी सद्यस्थितीत केली जात आहे. सार्वजनिक वैद्यकीय यंत्रणा अपुरी असल्याने, खासगी रुग्णालये, स्वयंसेवी संस्थांनीही कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सहकार्य करणे आवश्‍यक असल्याचे डॉ. दंदे म्हणाले.

कोरोनापासून बचावासाठी महत्त्वाचे

  • कोरोनाची स्टेज 1 - विदेशातून भारतात आलेल्या व्यक्तीपासून लागण
  • कोरोना स्टेज 2 - संपर्कातील लोकांना विषाणूची लागण
  • कोरोना स्टेज 3 - बाधित व्यक्तींमुळे समाजातील इतरांना झालेली लागण
  • कोरोना स्टेज 4 - संपूर्ण जगात झपाट्याने प्रसार
  • भारतात सद्यस्थितीत कोरोना स्टेज 3 अवस्थेत आहे
  • कोरोना विषाणूचे आयुष्य सहा तास असते, त्यानंतर तो मरतो.
  • विषाणू हवेतून पसरत नाही तर संपर्कात आलेल्या बाधित व्यक्तीपासून पसरत आहे.
  • वापरलेले मास्क कुठेही फेकू नये.
  • खोकलताना तोंडावर रुमाल ठेवावा.
  • लहान मुले, गर्भवती स्रिया आणि ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी.
  • दोन व्यक्तीमध्ये दीड ते सहा फुट अंतर राखावे.
  • लग्न, वाढदिवस इत्यादी कार्यक्रमात जाणे टाळावे.
  • कुटुंबातील सदस्याला सर्दी खोकला झाला असल्यास त्याच्यापासून लांब राहावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'ची दादागिरी संपणार? पुतीन यांची भारताला मोठी ऑफर! दोन्ही देशांना सापडला नवा व्यापारी मार्ग

Charas Seized : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कोटींचे चरस जप्त; बँकॉकहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉस्मेटिकच्या डब्यांतून तस्करी

Lohgaon News : लोहगाव अत्याचार प्रकरण; आरोपीला कठोर शिक्षेची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Nagpur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपीला अटक, दोन महिन्यांपूर्वी आला होता कारागृहातून सुटून

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT