Coronas new strain raises concerns in Nagpur New corona virus news 
नागपूर

नव्या ‘स्ट्रेन’मुळे वाढला ‘स्ट्रेस’; चार नव्या विषाणूचे संशयित आढळल्याने उपराजधानीसाठी धोक्याची घंटा

केवल जीवनतारे

नागपूर : चीनच्या वूहान प्रयोगशाळेत आढळलेल्या कोरोना विषाणूचे जगभरात थैमान घालणे थांबले नसतानाच ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या विषाणूमुळे जगाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. अत्यंत वेगाने संक्रमित होणाऱ्या या नव्या ‘स्ट्रेन’मुळे भारताचीही चिंता वाढली आहे. युरोपातून नागपुरात आलेल्या प्रवाशांपैकी चौघे प्रवाशांना नव्या विषाणूची बाधा झाल्याचा संशय आहे. मेडिकलमधील विलगीकरण कक्षात भरती असलेल्या या संशयितांवर डॉक्टर बारीक लक्ष ठेवून आहेत.

विदेशातून परत आलेली ४२ वर्षीय महिला व मुलीची कोरोना तपासणी करण्यात आली. तपासणी अहवालात ते कोरोनाबाधित असल्याचे आढळले. दरम्यान धंतोली येथील हा ३६ वर्षीय तरुणही लंडनहून नागपुरात परतला होता. त्यामुळे आतापर्यंत युरोपातून परतल्यानंतर कोरोनाची बाधा झाल्याचे निदान करण्यात आलेल्यांची संख्या चारवर गेली आहे. या चारही जणांच्या घशातील स्राव नमुने पुण्यातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. सद्या हे सर्वजण डॉक्टरांच्या निरीक्षणात आहेत.

तीन दिवसांपूर्वी इंग्लड येथून प्रवास करून आलेल्या एका तरुणाच्या माध्यमातून संपर्कातील १० जण कोरोनाबाधित झाले. हा कोरोनाचा नवा स्ट्रेन तर नाही, अशी जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र, अद्याप पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेले अहवाल आले नसल्यामुळे सद्यातरी त्यांना नवीन कोरोना असल्याचे सांगता येत नाही, असे प्रशासनाने जाहीर केले.

चार दिवसांत परदेशी प्रवास करून आल्यानंतर कोरोनाची चाचणी बाधित आढळलेल्या चारही जणांना लंडन प्रवासाची पार्श्वभूमी आहे. काल रात्री ४० वर्षीय महिलेसोबत मुलीलाही कोरोनाची लागण झाल्याने मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यामुळे या चौघांनाही मेडिकलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

या घडामोडीत गेल्या काही दिवसांमध्ये लंडनवरून परतलेल्या याच विमानातील ३९ सहप्रवाशांची यादीही महापालिका प्रशासनाला देण्यात आली आहे. या सर्वांच्या आरोग्याबाबत महापालिकेचा आरोग्य विभाग माहिती घेत आहे.

अहवालाची प्रतीक्षा

चौघांचे नमुने नवीन कोरोना तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहेत. कोरोना तपासणी अहवाल येणे बाकी असल्याने त्यांना मेडिकलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे. विदेशातून आलेल्या इतर चार प्रवाशांचे येथील एक हॉटेलमध्ये संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले होते. चार दिवसांनंतर यांची ‘आरटीपीसीआर’ तपासणी करण्यात येणार आहे. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यास गृहविलगीकरणात ठेवण्यात येईल. मात्र, अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांना मेडिकलच्या विशेष विलगीकरण कक्षात भरती करण्यात येईल़.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT