The coronavirus negligence of the people in the market in Nagpur 
नागपूर

कोरोनाचे ‘सुपर स्प्रेडर’ बघायचे? चला नागपूरला; उपराजधानीतील बाजारात लोकांचा बेदरकारपणा

राजेश रामपूरकर

नागपूर : शहरात दिवसागणित कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होत आहे. दररोजचा आकडा साडेतीन हजारांच्यावर असल्याने पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून प्रशासन आणि पालकमंत्र्याकडून फेरीवाल्यांसह व्यापाऱ्यांना व नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, अजूनही लोकांमध्ये याबाबत गांभीर्य नाही. लोक बाजारात विनाकारण गर्दी करत असल्याचे चित्र आहे. यावरून लोकांचा बेदरकारपण वाढल्याचे स्पष्ट होत आहे. हेच ‘सुपर स्प्रेडर’ असल्याचे बोलले जात आहे.

नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले असतानाही शहरात अक्षरश: सामाजिक अंतर ठेवण्याच्या धोरणाचा बट्ट्याबोळ झालेला बघावयास मिळाला. सुरक्षित अंतर ठेवून उभे राहण्याचे कुठलेही नियम पाळले गेल्याचे दिसून आले नाही. महिला देखील मोठ्या प्रमाणात लहान मुलांना घेवून बाजारात खरेदीसाठी आल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन सर्वच शासकीय यंत्रणांतर्फे सातत्याने केले जात असले तरी अनेक रस्त्यांवर, गल्लीबोळ तसेच मोहल्ल्यांमध्ये नागरीक, महिला फिरत आहेत. यामुळेच विनाकारण फिरणाऱ्या या लोकांवर पोलीस प्रशासन यंत्रणेने कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी सर्वस्तरातून केली जात आहे. 

वैद्यकिय, किराणाआदी अत्यावश्यक कामांसाठीच घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरी देखील भाजीपाला घेण्यासाठी दररोज शहरातील अनेक भाजीबाजारांमध्ये व रस्त्यांवर गर्दी उसळत आहे. बाजारांमध्ये सुरक्षित अंतर राखण्याचे कुठलेही नियम दुकानदार व नागरीकांकडून पाळले जात नसल्याची तक्रार परिसरात घरात राहणाऱ्या नागरीकांतर्फे केली जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारीच सोशल मीडियाच्या माध्यमातून गर्दी टाळा, अनावश्यक ठिकाणी जाण्याचे टाळा, मास्क परिधान करण्याचे विसरू नका, हात धूवत राहा व योग्य अंतर पाळा असे कळकळीचे आवाहन केले. तरी आज शहरात टाळेबंदीच्या भीतीने बाजारात ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र होते.

पोलिसांनी कारवायांची धार तीव्र केली

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पोलिसांनी कारवायांची धार तीव्र केली आहे. मास्क न घालता फिरणाऱ्यांसह उघड्यावरील विक्री अशा विविध पातळ्यांवर कारवाया सुरू केल्या आहेत. असे असताना नागरिक ऐकत नसल्याने आता मास्क न घालणाऱ्या दुकानदार आणि ग्राहकांवरही दंड आकारावा. तसेच संबधित दुकान एक महिन्यासाठी बंद करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT