पारशिवनीः नुकत्याच आलेल्या महापुराने वाहून गेलेला सालई माहुली दरम्यानचा नदीवरील पूल. 
नागपूर

खर्च १२ कोटी, पुलाची वयोमर्यादा फक्त दोन वर्ष? पारशिवनीकरांना पडला ‘पेंच’....

रुपेश खंडारे

पारशिवनी (जि.नागपूर): मागील महिन्यात मुसळधार पाऊस आल्याने पेंच धरणातील पाणी पेंच नदीपात्रात सोडण्यात आले होते. पेंच नदीला महापूर आला असल्याने नदीकाठावरील गावे पाण्याखाली आली होती. पुरामुळे पेंच नदीवरील पारशिवनी तालुक्यातील सालई माहुली दरम्यानच्या नदीवरील १२ कोटी २० लाख किमतीचा पूल पुराच्या पाण्यात अल्पावधीतच वाहून गेला. त्यामुळे पुलाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पूल वाहून गेल्याने येथील अनेक गावाच्या एकमेकांशी संपर्क तुटला असून या पुलाच्या दुरुस्तीची प्रतीक्षा केली जात आहे. या पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच या ठिकाणी नव्याने दर्जेदार पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे .

अधिक वाचाः  तब्बल सात वर्षांनंतर गावकऱ्यांची भागली तहान; नळ योजनेसाठी ग्रामपंचायत कमिटीच्या प्रयत्नांना यश

ग्रामस्थांना आहे पुल दुरूस्तीची प्रतीक्षा
१२ कोटी २०लाख रुपये खर्च करुन मागील दोन वर्षाआधी हा पूल तयार करण्यात आला होता. नुकत्याच आलेल्या महापुराचा तडाका हा पूल सहन करु शकला नाही आणि पूल पाण्यात वाहून गेला. त्यामुळे बांधकामातील निकृष्ट दर्जा उघडा पडला. या पुलाच्या बांधकामात मोठा गैरव्यवहार झाला असल्याने अल्पावधीतच या पुलाचे ‘राम नाम सत्य’ झाले. दोन वर्षेही हा पूल टिकाव धरू शकला नसल्याने बांधकाम किती निकृष्ट केले असावे, हे दिसून येते. तरी या बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी स्थानिकांची असून या ठिकाणी नवीन पूल तयार करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. भाजपच्या काळात या पूलाचे बांधकाम करण्यात आले होते, हे विशेष.
हा पुल जमीनदोस्त झाल्याने  पारशिवनी तालुक्यातील चारगाव, कोलीतमारा, पालासावळी, सालेधाट, घाटपेंढरी, सुवरधरा, पेंच, बिटोली नेउरवाडा यासह अनेक गावाचा रामटेक शहर व गावांशी असलेला संपर्क तुटला आहे. तसेच पारशिवनी शहरात येण्यासाठी येथील माहुली, पाली, उमरी, काळाफाटा गावातील नागरिकांना नयाकुंड मार्गे यावे लागत आहे. शाळकरी मुलांना हा पुल येण्याजाण्यास अत्यंत उपयुक्त होता, हे विशेष.
अधिक वाचाः साथीदाराच्या मदतीने पतीला संपविले, धरणात फेकला मृतदेह

पुलाची दुर्दशा होण्यास जवाबदार कोण?  
एवढी मोठी घटना होत असताना संबधित भागाचे अधिकारी, येथील आमदारांनी समोर येऊन या पुलाच्या बांधकामात दोषी असणाऱ्ंयाविरोधात गुन्हा का नोंदविण्यात आला नाही?तसेच कारवाई करण्याची अपेक्षा असताना संबंधितांवर कारवाई का करण्यात आली नाही, हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक आश्‍चर्य व्यक्त करीत आहेत. पुलाचे काम सुरु असताना स्थानिकांनी अनेक तक्रारी केल्या. या कामात अनियमितता असल्याने या पूलनिर्मितीचे कामही काही काळापुरते बंद पाडले होते. लोकप्रतिनिधींनाही याबाबत निवेदन दिले. बांधकाम विभागातील उच्चभृ अधिकाऱ्यांनाही या बाबत अवगत केले होते. परंतू कुणीही या निकृष्ट कामाची दखल घेतली नाही. या कामात  गैरव्यवहार झाला असल्याच्या आरोप करीत नागरिकांनी कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.

संपादनः विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT