Counting of votes for Nagpur Graduate Elections begins 
नागपूर

नागपूर पदवीधर निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात; विविध अधिकारी उपस्थित

मंगेश गोमासे

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी आठ वाजता मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सुरुवात झाली. निवडणूक निरीक्षक एस. वी. आर. श्रीनिवास, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांच्यासह विभागातील सहा जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी व मतमोजणीशी संबंधित विविध अधिकारी उपस्थित आहेत.

पहिल्या टप्प्यात मतपत्रिकांचे गठ्ठे बनवणे, सरमिसळ आदी कामे होत आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यात एकूण १ लाख ३२ हजार ९२३ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ६४.३८ आहे. मतमोजणी चार कक्षात २८ टेबलवर होत आहे. २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे सर्व मतपत्रिका एकत्रित करण्यात येतील.

यातून २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे ४० गठ्ठे अशी एक हजार मते प्रत्येक टेबलवर करण्यात येत आहेत. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण होईल. एकूण वैध मतांप्रमाणे ठरविण्यात आलेला मतांचा कोटा पूर्ण झालेला नसल्यास आवश्यकतेनुसार दुसऱ्या, तिसऱ्या अशी क्रमश: पसंतीची मते मोजण्यात येतील.

सध्या टपाल पत्रिके नंतर मतपेटीद्वारे झालेले मतदान एकत्रित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या सर्व मतपत्रिका एका हौदात एकत्रित करण्यात येत आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Aadhaar Card Update: 'आधार कार्ड'मधून खरंच नाव आणि पत्ता गायब होणार? सत्य काय आहे? सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण समोर

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

SCROLL FOR NEXT