court gives custody to man in physical abused case nagpur crime news 
नागपूर

अखेर भोंदूबाबाची कारागृहात रवानगी, भूत काढण्याचा बहाणा करत केला होता चौघींवर बलात्कार

अनिल कांबळे

नागपूर : नागपुरातील १७ वर्षीय मुलीसह तिच्या आई, आजी आणि मामीवर बलात्कार करणाऱ्या दुलेवाले महाराजाला पारडी पोलिसांनी न्यायालयात उपस्थित केले. त्या भोंदूबाबाला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यांची न्यायालयीन कोठडी अंतर्गत कारागृहात रवानगी केली. धर्मेंद्र विठोबा निनावे ऊर्फ दुलेवाले (वय ५० रा. अम्बेनगर,पारडी), असे मांत्रिकाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला भुतबाधा झाल्याचे सांगून चंद्रपूर येथे तिच्यासोबत नग्न पूजा करावी लागेल. पूजा न केल्यास कुटुंबातील सर्वांचाच मृत्यू होईल,अशी भीती भोंदूबाबाने पीडित १७ वर्षीय मुलीच्या आईला दाखविली. भीतीपोटी तिची आई तयार झाली. तो दोघींना घेऊन चंद्रपूर येथे गेला. चंद्रपूरमधील भक्त निवासात त्याने मुलीच्या आईसमोरच विवस्त्र करून पूजा केली. त्यानंतर तिच्यावर आईसमोरच बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर भोंदूबाबाने पीडित मुलीची ६० वर्षीय आजी व ३० वर्षीय मामीवरही बलात्कार केला. चौघींवरही बलात्कार केल्यानंतर तो पीडित मुलीच्या वडिलांना एक लाख रुपयांची मागणी करून छळ करायला लागला. त्याचा छळ असह्य झाल्याने भोंदूबाबाविरूद्ध पीडित मुलीने तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून मांत्रिकाला अटक केली. त्याची पोलिस कोठडी घेतली. पोलिस कोठडी संपल्याने पोलिसांनी सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला कारागृहात रवानगी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT