dog 
नागपूर

९ वर्षांच्या मुलाला चावला कुत्रा अन् मालकिणीला तब्बल ६ महिन्यांचा कारावास; न्यायालयाचा निर्णय 

केतन पळसकर

नागपूर : घराजवळ राहणाऱ्या ९ वर्षीय चिमुकल्यास कुत्रा चावल्याने मालकीणीस सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा प्रथम श्रेणी न्यायालयाने सुनावली. तसेच, चिमुकल्यास नुकसान भरपाई म्हणून ५० हजार रुपये देण्याचेसुद्धा आदेशामध्ये नमूद केले. संगीता विजय बालकोटे असे ४९ वर्षीय आरोपी मालकीणीचे नाव आहे. तीच्या विरोधात चिमुकल्याच्या आईने नंदनवन पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविली होती.

तक्रारीनुसार, सोनल बदुकले या नंदनवन येथील श्रीकृष्ण नगर येथील रहिवासी आहेत. २९ जून २०१४ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्यांचा ९ वर्षीय मुलगा आर्यवरी आपल्या मित्रा बरोबर घरासमोर खेळत होता. या दरम्यान, त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या आरोपी संगीता बालकोटेचे कुत्रा वावरत होता. आर्यवरी दिसताच त्याने त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये, त्याच्या उजव्या खांद्याला आणि पायाला चावा घेतल्याने जखमी झाल्या. सोनल यांनी आरोपी संगीता बालकोटे यांच्या विरोधात नंदनवन पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय यादव, हवालदार महादेव कोरपे, प्रमोद यावले यांनी तपास करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले. कुत्रा पाळताना केलेली हयगय बघता आरोपी संगीता बालकोटेला कलम २८९ नुसार सहा महिन्यांचा कारावास आणि मुलास नुकसान भरपाई म्हणून ५० हजार रुपयांची शिक्षा सुनावली. 

सरकारतर्फे अँड. मोना राऊत (देवलकर) यांनी, आरोपीतर्फे टि.एस. पिजळकर यांनी बाजू मांडली. या प्रकरणी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी जे. डी. जाधव यांच्या समक्ष सुनावणी झाली. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT