Covaxin vaccine 
नागपूर

नागपूर : सहा हजार आठशेवर विद्यार्थ्यांचे लसीकरण

पहिल्या दिवशी मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद : आणखी पाच केंद्रांची पडणार भर

सकाळ ऑनलाईन टीम

नागपूर : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला (Vaccination) पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहा हजार ८३८ विद्यार्थ्यांनी आज कोवॅक्सिनचा (Covaxin vaccine) पहिला डोस घेतला. विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी आणखी पाच केंद्रांची भर टाकण्यात आली. त्यामुळे उद्यापासून १९ केंद्रांसह शाळा, महाविद्यालयांमध्ये लसीकरणाची सोय उपलब्ध होणार आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आज शहरात दहावी ते बारावीतील १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाला सुरुवात झाली. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत बजेरिया येथील राजकुमार गुप्ता समाजभवनातून लसीकरणाला प्रारंभ झाला. सकाळी दहा वाजतापासून लसीकरण करण्यात आले.

लसीकरण केंद्रांवरील सकाळी गर्दी झाली. त्यामुळे विद्यार्थीही लसीकरणासाठी उत्सुक असल्याचे दिसून आले. अनेक विद्यार्थी पालकांसह केंद्रावर आले. शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी लस घेतली. महापालिकेने आज १४ केंद्रांची सोय उपलब्ध करून दिली होती तसेच ३३ शाळा, महाविद्यालयांनीही सुविधा उपलब्ध करून दिली. महापालिकेचे केंद्र व शाळा, महाविद्यालयात आज पहिल्याच दिवशी सहा हजार ८३८ विद्यार्थ्यांनी लस घेतली. शहरात लसीकरणासाठी पात्र १ लाख ३० विद्यार्थी आहेत.

७० विद्यार्थ्यांना पाठवले परत

सर्दी, खोकला असल्याने जवळपास ७० विद्यार्थ्यांना आज पहिला डोस घेणे शक्य झाले नाही. मेडिकल येथील केंद्रावरून सात विद्यार्थ्यांना परत पाठविण्यात आले. १४ केंद्रांवर जवळपास ७० विद्यार्थी आज लस घेऊ शकले नाही.

१० जानेवारीपासून बूस्टर डोस

१० जानेवारीपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच फ्रंटलाईन वर्कर, डॉक्टर, नर्स आदींना बुस्टर डोस देण्यात येणार आहे. परंतु दुसऱ्या डोसनंतर नऊ महिने पूर्ण झालेल्यांनाच बुस्टर डोस देण्यात येईल. त्यामुळे अनेकांना बूस्टर डोससाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT