covid Vaccination will start soon in nagpur  
नागपूर

नागपुरात लसीकरणाला होणार सुरुवात; पहिला नंबर आरोग्य सेवकांचा; नोंदणी करणाऱ्यांनाच मिळणार लस 

राजेश प्रायकर

नागपूर ः कोरोना लसीकरणासंदर्भात महापालिका तयारी करीत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या लस येणार आहे. यांपैकी नेमकी कोणती लस येईल, हे स्पष्ट नाही. मात्र, शहरात तीन टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना लस दिली जाणार आहे. अंदाजे २० हजार आरोग्य सेवकांना ही लस दिली जाईल, असे महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

महापालिकेत मंगळवारी आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. लसीकरणासाठी शहरातील सर्वच शासकीय व खाजगी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांच्या नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले. परंतु अद्यापही आवश्यक तसा प्रतिसाद नसल्याची खंत व्यक्त करीत आयुक्तांनी त्यांना लसही मिळणार नाही, असे सांगितले. 

जेवढ्या आरोग्य सेवकांची नोंदणी होईल, तेवढ्याच लस मिळणार आहे. त्यामुळे नोंदणी न करणाऱ्यांना लस मिळणार नाही. लसीकरण तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना तर दुसऱ्या टप्प्यात कोरोनाच्या काळात आघाडीवर राहून कामे करणारे पोलीस, विविध विभागातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिक, त्यानंतर विविध आजार असलेल्या नागरिकांना तर शेवटी इतर नागरिकांना लस देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोणती लस येणार माहीत नाही

लसीचे वेगवेगळे प्रकार आहेत. शहरात कुठल्या प्रकारची लस येणार हे स्पष्‍ट नाही. लस शहरात पोहोचल्यानंतरच कुठे आणि किती तापमानात ठेवायचे, हे स्पष्ट होईल. त्यानंतर सरकारकडे तशी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येईल, असे आयुक्त म्हणाले.


संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमधील गँगस्टर करनजीत गुग्गाला दिल्लीत अटक

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT