Crime Branch arrested two accused with three pistols 
नागपूर

दोन युवक कमरेला पिस्टल लावून जात असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली अन्‌ पुढे... 

अनिल कांबळे

नागपूर : गुन्हे शाखा पोलिसांनी बोलेरो वाहनातून प्रवास करीत असलेल्या दोन युवकांना अटक केली. त्यांच्याकडून विदेशी बनावटीचे तीन पिस्टल्स आणि सात बुलेट्‌स जप्त केल्या. ही कारवाई सोमवारी रात्रीच्या सुमारास सेमिनरी हिल्स परिसरात केली. शशांक सुनील समुद्रे (वय 20, ठक्‍करग्राम, पाचपावली) आणि ऋषभ राकेश शाहू (वय 18, रा. बाळाभाऊपेठ, कमाल चौक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन युवक कमरेला पिस्टल लावून कुणाचातरी "गेम' करण्यासाठी जात असल्याची टीप गुन्हे शाखेचे पोलिस शिपाई बादल मांढरे यांना मिळाली. त्यांनी लगेच गुन्हे शाखेचे उपायुक्‍त गजानन राजमाने यांना दिली. डीसीपी राजमाने यांनी लगेच एका पथकाला सोमवारी रात्रीच्या सुमारास सेमिनरी हिल्स, टीव्ही टॉवर चौक परिसरात तैनात केले. 

रात्रीच्या सुमारास बोलेरो भरधाव येत असताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी लगेच रस्त्यात कठडे लावून वाहनाला अडविले. वाहनातून दोन युवकांना खाली उतरण्यास सांगितले. युवकांच्या संशयित हालचालींमुळे लगेच ताब्यात घेण्यात आले. दोघांचीही झडती घेतली असता त्यांच्या कमरेला खोचलेल्या तीन पिस्टल्स पोलिसांना मिळाल्या. तसेच एका युवकाकडून सात बुलेट्‌स पोलिसांनी जप्त केल्या. पोलिसांनी दोन्ही युवकांना ताब्यात घेऊन अटक केली. 

ठळक बातमी - आई रडत रडत म्हणाली, बाळा पब्जी नको खेळू रेऽऽ नाही तर तू पण...
 

शशांक समुद्रे आणि ऋषभ शाहू अशी त्यांनी नावे सांगितली. दोघांवर गिट्टीखदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या तीन पिस्टलची किंमत बाजारात 1 लाख 80 हजार रुपये असून, 14 हजार रुपये बुलेट्‌सची किंमत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत. ही कारवाई डीसीपी गजानन राजमाने यांच्या पथकाने केली. 
 

पिस्टल्स आल्या कुठून? 


आरोपींकडे सापडलेल्या पिस्टल्स विदेशी बनावटीच्या आहेत. आरोपींकडे पिस्टल्स आल्या कुठून? याचा तपास करीत आहेत. नागपुरात बिनधास्तपणे पिस्तूल घेऊन आरोपी फिरत असतील तर गुन्हेगारांवर पोलिसांना वचक ठेवणे गरजेचे झाले आहे. या पिस्टल्स मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार या राज्यातून नागपुरात आल्या असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare Health Update : सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

इराणला अमेरिका देणार नुकसान भरपाई, १० कठोर अटी; ट्रम्पना मान्य, युद्धबंदीच्या चर्चेला तयार

'मी ढसाढसा रडतो...' स्वप्नील जोशी खरं सांगताना म्हणाला...'नाच ग घुमा पाहताना मला इतकं...'

Latest Marathi News Live Update: अमरावतीत फुलांचे दर कोसळले! १५० रुपयांचा गुलाब आता फक्त ५० रुपयांत

UP Treasure: पडक्या घराखाली सापडला खजिना’! लाखोंची नाणी उचलून लहान मुलांनी केला पोबारा, थरारक घटनेचा video viral

SCROLL FOR NEXT