Crime fire against seven police personnel, including an inspector 
नागपूर

अल्पवयीन मुलांची धिंड काढणे आले अंगलट; निरीक्षकासह सात पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा

योगेश बरवड

नागपूर : बारमध्ये सशस्‍त्र दरोड्याच्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढणे जरीपटका पोलिसांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या प्रकरणात जरीपटक्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकासह एकूण सात पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध बालकांचे संगोपन व संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक खुशाल तिजारे, उपनिरीक्षक विजय धुमाळ, पोलिस हवालदार लक्ष्मण चौरे, मुकेश यादव, वसंत तिवारी, डागा आणि पोलिस शिपाई सुशील महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक आणि पाचही हवालदार जरीपटका ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकातील असल्याचे सांगितले जाते.

२२ सप्टेंबरला जरीपटका हद्दीतील एका बारमध्ये घुसून शस्त्राच्या बळावर लूट करण्यात आली होती. याप्रकरणात एका सज्ञान आरोपीसह पाच अल्पवयीन मुलांचा समावेश होता. जरीपटका पोलिसांना गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरू केला. त्याच रात्रीनंतर पहाटेच्या सुमारास सर्व आरोपींना जरीपटका पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नारा येथून त्यांना पकडून आणल्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली. त्यांना पाटणसावंगी येथून ताब्यात घेण्यात आल्याचा दावा करण्यात येत होता.

व्हीडिओ क्लिप व्हायरल

मुलांना ठाण्यात आणून खरपूस समाचार घेण्यात आला. तत्पश्चात अर्धनग्न अवस्थेत जरीपटका सिमेंट रोडवरून धिंड काढण्यात आली. गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी ही धिंड आल्याचा समज होऊन अनेकांनी याप्रसंगाचे व्हिडिओ काढले. समाजमाध्यमांवरून अल्पावधीत ते व्हायरल झाले. मुलांना अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावरून मारहाण करीत नेत असल्याचे व्हीडिओ क्लिपमध्ये दिसते.

मुलांना पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला

परेडनंतर मुलांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात मुलांची विचारपूस केली असता धक्कादायक बाबी पुढे आल्या. संपूर्ण प्रकार अनधिकृत असल्याने मुलांना पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार तीन मुलांनी जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही बाब गांभीर्याने घेत साहायक पोलिस आयुक्त परशुराम कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनात चौकशीचे आदेश दिले. चौकशीअंती गुरुवारी जरीपटका ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT