हुडकेश्वर हद्दीत दोघांनी चाकुने वार करीत १५ वर्षीय मुलाला जखमी केले. तर, एमआयडीसी हद्दीत मुलाने फरशीने फटके हाणून जन्मदात्या आईच्या हत्येचा प्रयत्न केला. 
नागपूर

उपराजधानी बनतेय क्राईम कॅपिटल; गुंडांचा सुळसुळाट; क्षुल्लक वादांतून होताहेत चाकू आणि शस्त्रांनी वार  

योगेश बरवड

नागपूर ः उपराजधानीतील गुंड चांगलेच सोकावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत खुनाच्या घटना समोर येत आहेत. घरगुती वादातूनही गंभीर स्वरुपाच्या घटना घडत आहेत. गुरुवारी हुडकेश्वर हद्दीत दोघांनी चाकुने वार करीत १५ वर्षीय मुलाला जखमी केले. तर, एमआयडीसी हद्दीत मुलाने फरशीने फटके हाणून जन्मदात्या आईच्या हत्येचा प्रयत्न केला.

जुने सुभेदार ले-आउट येथील गंगासोना अपार्टमेंटमध्ये राहणारा अथर्व राऊत (१५) हा गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास भाऊ आणि मित्रासह ट्युशनला जात होता. हुडकेश्वर ठाण्याच्या हद्दीतील दुर्गानगर उद्यानाजवळील मैदानाजवळून जात असताना १७ ते २३ वर्षे वयोगटातील दोघे तिथे आले. कोणतेही कारण नसताना वाद घालत शिवीगाळ करू लागले. 

काही क्षणातच हातबुक्कीने मारहानही सुरू केली. त्याचवेळी आरोपींपैकी एकाने जवळचा चाकू काढून त्याचे डोके व पंज्यावर वार करीत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.

दुसरी घटना एमआयडीसी अंतर्गत घडली. वानाडोंगरी येथील रहिवासी लक्ष्मीबाई लांडगे (६५) या गुरुवारी सकाळी घरीच हजर होत्या आरोपी मुलगा राजू (२८) याने पैसे देण्यासाठी तगादा लावला होता. लक्ष्मीबाई त्याला टाळत होत्या. संतापाच्या भरात राजूने घरातील फरशी उचलून त्यांचे डोके व हातावर फटके हाणून गंभार जखमी केलै. दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT