Prisoner taken into custody by police Sakal
नागपूर

Belgaum Crime News : नागपूर पोलिसांकडून कैदी ताब्यात

मंत्री गडकरी धमकी प्रकरण; खंडणी प्रकरणाची चौकशी

सकाळ वृत्तसेवा

Belgaum Crime News : केंद्रीय राष्ट्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाला फोन करून पैशासाठी धमकी दिल्याच्या प्रकरणात जयेश पुजारी या कैद्याला नागपूर पोलिसांनी ताब्यामध्ये घेतले आहे.

बेळगाव येथील हिंडलगा कारागृहातील एका कैद्याकडून मंत्री गडकरी यांना दुसऱ्यांदा पैशासाठी फोन करून धमकी दिल्याचे प्रकरण पुढे आल्यानंतर चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

मंत्री गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयाशी पहिल्यांदा १४ जानेवारी २०२३ रोजी जयेश नामक कैद्याने संपर्क साधत १०० कोटींची खंडणी मागितली.

तपासाची धूळ खाली बसते न बसते तेच या संदर्भामध्ये आणखी एकदा संपर्क साधत १० कोटींची खंडणी मागण्यात आली आहे. बेळगावमधील हिंडलगा कारागृहामधून कॉल करत पैशाची मागणी केली आहे.

या दरम्यान संपर्क साधलेल्या कैद्याने परत आपले नाव जयेश असल्याचे नागपूर पोलिसाकडून कैदी ताब्यात सांगितले. यामुळे याची गंभीर दखल घेऊन गेल्या आठवड्यामध्ये येथे नागपूरचे दोन पोलिस बेळगावात दाखल झाले. गुरुवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस चौकशी केली.

कैद्याचा मोबाईल आणि इतर साहित्याची तपासणी करण्यात आली. त्याशिवाय कैदी व येथील अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. त्यानंतर कैद्याला नागपूरला नेण्यात आल्याची माहिती आहे. त्याठिकाणी प्रकरणाचा उलगडा करण्याची तयारी सुरुआहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad Chemical: तासवडेत स्फाेटांची मालिका सुरूच; केमिकल कंपनीत कॅन फुटून स्फाेट, ‘प्रदूषण’चे निरीक्षण!

त्यांना चालता येत नव्हतं... शेवटच्या दिवसांत अशी झालेली विक्रम गोखलेंची अवस्था; मराठी अभिनेत्री म्हणाली, 'त्यांच्या पोटात...'

Latest Marathi News Live Update : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Wife Rights India : पतीच्या मृत्यूनंतरही पत्नीला मिळते पोटगी, हायकोर्टाचा मोठा निर्णय; नेमकं काय आहे प्रकरण ?

Rajapur Muncipal :. इतिहासाचा प्रवास; राजापूर पालिकेच्या १५० वर्षांची गाथा, ब्रिटिश काळाचा ठसा

SCROLL FOR NEXT