Crime Sakal
नागपूर

Crime News : धक्कादायक! महिला ऑटोचालकास शिविगाळ करत मारहाण; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आमच्या जागेवर ऑटो उभा केला म्हणून दोन ऑटोचालकांनी एका महिला ऑटोचालकाला मारहाण करीत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना इंदोरा चौकात १० मे रोजी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका ऑटोचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कुणाल उर्फ बंटी मधूकर मेश्राम (वय ४०, रा. इंदोरा ट्राफिक ऑफिसमागे) असे आरोपी ऑटोचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटोचालक महिला गेल्या २६ वर्षांपासून ऑटो चालवितात. त्या इंदोरा चौक ते सीताबर्डी यादरम्यान सवारी घेतात.

१० मे रोजी त्या नियमितपणे टेकानाका येथून दोन सवारी घेऊन इंदोरा चौकात आल्या. यावेळी तिथे ऑटोचालक (एमएच४९, ई- ९१३) कुणाल मेश्राम आणि दिनेश येरपुडे (एमएच४९, ई-३०२३) हे दोघेही उभे होते. त्यांना एका सवारीची गरज असल्याने त्यांनी तिथे ऑटो उभा केला. यावेळी दोघांनी महिलेला त्यांच्याजवळ येऊन धमकावित ‘तू इथे ऑटो का उभा केलास तुझा बापाची जागा आहे का’? म्हणत शिविगाळ करू लागले.

यावेळी महिला ऑटोबाहेर येताच, त्यांनी अश्‍लिल शिविगाळ करीत जीवे मारण्याचीही धमकी दिली. तसेच, हात ओढून नाकावर बुक्क्यांनी मारहान केली. त्यामुळे त्या जखमी झाल्यात. हा प्रकार लक्षात येताच, इतरांनी धाव घेतल्याने दोघेही तिथून निघून गेलेत.

त्यावरुन पोलिसांना ऑटो चालक महिलेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसा उपनिरीक्षक राजेश डोंगरे यांनी विविध कलमासह गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT