Crimes filed against three police officers Nagpur crime news 
नागपूर

महिलेमुळे दोन पती आणि एका प्रियकराने केली आत्महत्या; तीन पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

अनिल कांबळे

नागपूर : महिला प्रकल्प अधिकाऱ्याने यशोधरानगर पोलिसांशी संगनमत करून प्रियकराकडून सात लाख रुपये उकळले. त्यांतरही पोलिसांनी खंडणीसाठी तगादा लावला. या जाचाला कंटाळून प्रियकराने आत्महत्या केली. या प्रकरणात तीन पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध ठाणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले. रमाकांत दुर्गे, अशोक मेश्राम आणि दीपक चव्हाण अशी पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला प्रकल्प अधिकारी नीतू (बदललेले नाव) ही विवाहित असून, तिला मुलगी आहे. तिचे अठराव्या वर्षीच लग्न झाले होते. लग्नानंतर तिने शिक्षण पूर्ण केले. वेगवेगळ्या पुरुषांशी मैत्री करण्याच्या तिच्या सवयीमुळे पहिल्या पतीने आत्महत्या केली होती. त्यानंतर तिची अरुण नावाच्या एसटी चालकाशी ओळख झाली.

तिने त्याच्याशी लग्न केले. ती एमपीएससीची तयारी करीत असताना सचिन साबळे या युवकाशी ओळख झाली. दोघेही एकाच वर्षी परीक्षा पास होऊन प्रकल्प अधिकारी पदावर नोकरीवर लागले होते. सचिन ठाणे शहरात प्रकल्प अधिकारी कार्यरत होता. त्यामुळे दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. 

पतीने केली आत्महत्या

नीतू आणि सचिनच्या प्रेमसंबंधाची कुणकुण अरुणला लागली होती. त्याने समजूत घातली; मात्र तिने नकार दिला. त्यामुळे कंटाळून अरुणने डिसेंबर २०२० मध्ये आत्महत्या केली. त्याची नोंद यशोधरानगर पोलिस ठाण्यात झाली. तपास अधिकारी पीएसआय दीपक चव्हाण याने नीतूला हाताशी धरले आणि पैसे कमविण्याचा सल्ला दिला. 

असा झाला खेळ सुरू

‘तुझ्यासोबतच्या अनैतिक संबंधामुळे माझ्या पतीने आत्महत्या केली. त्यामुळे तू माझ्याशी लग्न कर; अन्यथा मी पोलिसांत तक्रार करेल’, अशी धमकी नीतूने सचिनला दिली. सचिनने लग्नास नकार दिला. लगेच पीएसआय दीपक चव्हाण याने सचिनला फोन केला आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. सचिन घाबरला आणि नागपुरात आला. त्याने रमाकांत दुर्गे यांना साडेचार लाख रुपये दिले. पीएसआय चव्हाणने पुन्हा फोन करून दोन लाख रुपये मागितले. त्याने पुन्हा दोन लाख रुपये दिले. त्याला पुन्हा फोन करून पीआय अशोक मेश्राम यांच्या नावावर तीन लाख रुपये मागितले. यामुळे तो त्रस्त झाला होता.

प्रकल्प अधिकाऱ्याने केली आत्महत्या

सचिनने १८ फेब्रुवारीला अंबरनाथ येथे गळफास घेतला. त्याने पीआय रमाकांत दुर्गे, अशोक मेश्राम आणि पीएसआय दीपक चव्हाण आणि नीतू, दादाराव मानकर आणि ऐश्‍वर्या नावाची तरुणी या सहा जणांचे नाव सुसाइड नोटमध्ये लिहून भावाला ई-मेल केला. त्यावरून तीन पोलिस अधिकारी, नीतूसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पीएसआय चव्हाण याला ठाणे पोलिसांनी अटक केली असून, त्याला सात दिवसांचा पीसीआर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NavIC: आता भारतीयांना रस्ता गुगल मॅप्स नाही, तर'नाविक' सांगणार; सरकारची नेमकी योजना काय?

Narayangaon News : पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; एक किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Mahadev Jankar : सरकार शक्तिपीठ महामार्गाला तरतूद करते, मात्र निवडणूक आश्वासनातील कर्जमाफीला तरतूद करत नाही

JDU Expelled Leaders: मोठी बातमी! निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाकडून ११ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, कारण काय?

ICC Womens World Cup 2025 : ठरलं! भारत सेमीफायनलमध्ये अपराजित ऑस्ट्रेलियाशी भिडणार; द. आफ्रिकेला हरवत कांगारूं पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल...

SCROLL FOR NEXT