The cry of private hospitals for oxygen price hike 
नागपूर

ऑक्सिजन दरवाढीचा खाजगी हॉस्पिटल्सचा कांगावा

राजेश प्रायकर

नागपूर : महापालिकेने खाजगी रुग्णालयांना कोविड हॉस्पिटल म्हणून सेवा देण्याच्या सूचना केल्यानंतर यातून सुटका करून घेण्यासाठी रुग्णालय संचालकांनी वेगवेगळी शक्कल लढविण्यास सुरुवात केली. त्यातही राज्य शासनाने कोविड रुग्णांच्या उपचारासाठी निश्चित केलेल्या दराऐवजी स्वतः ठरविलेले दर योग्य असल्याचा युक्तिवाद करताना खाजगी हॉस्पिटल्सने ऑक्सिजनचे दर वाढल्याचा कांगावाही केल्याचे दिसून येत आहे. मुळात शहरालाच नव्हे तर भंडारा, गोंदिया या शहरांनाही पुरेल एवढ्या ऑक्सिजनचे उत्पादन होत असून यात कुठेही दरवाढ झाली नसल्याचे सूत्राने नमूद केले.

महापौर संदीप जोशी यांनी ३ सप्टेंबरला खाजगी डॉक्टरांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी वाढत्या बाधितांसाठी बेड उपलब्ध करून देण्याची इच्छा व्यक्त केली होती. डॉक्टरांनी त्याचवेळी नकारात्मक भूमिका मांडल्याने त्यांचे कोविड रुग्णांना सेवा देण्याबाबतचे मनसुबे पुढे आले होते. खाजगी डॉक्टरांनी स्पष्टपणे नकार दिला नसला तरी समस्यांची ढाल पुढे करून कोविड हॉस्पिटल करण्यास टाळत असल्याचे चित्र आहे. नुकताच खाजगी हॉस्पिटल्सच्या एका संघटनेने महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांना पत्र लिहून वेगवेगळ्या समस्या मांडल्या.

कोविड रुग्णांना उपचारासाठी दर निश्चित केले, त्याच पद्धतीने ऑक्सिजनच्या वाढत्या दरावर तसेच बायो मेडिकल वेस्टच्या विल्हेवाटीसंदर्भातील वाढत्या दरावरही नियंत्रणाचा मुद्दाही खाजगी हॉस्पिटलने पुढे केला. ऑक्सिजनच्या वाढत्या दरावरून शहरातील काही डॉक्टरांशी चर्चा केली असता त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर शुल्कात कुठलीही वाढ झाली नसल्याचे सांगितले. ऑक्सिजनचे जम्बो सिलिंडरवर चाळीस रुपयांची किरकोळ वाढ असून ती लक्षणीय नसल्याचेही काही डॉक्टरांनी नमूद केले. त्यामुळे ऑक्सिजनच्या वाढीव मागणीवरून दर वाढल्याचा कांगावा केला जात असल्याचे दिसून येत आहे.

एवढेच शहरालाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी ५५ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असून ती पूर्ण होत असल्याचे जिल्हा प्रशासनाने नमूद केले. शहरात १२० टन ऑक्सिजन तयार होत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांची यांनी नमूद केले. नागपूर जिल्हाच नव्हे तर गोंदिया, भंडारा जिल्ह्यालाही नागपुरातून ऑक्सिजनची पूर्तता केली जात असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवड्यामुळे दर वाढल्याचा कांगाव्याचा खाजगी हॉस्पिटलकडून जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.

कुठे तयार होते ऑक्सिजन?
शहराला लागूनच असलेल्या बुटीबोरी, हिंगणा एमआयडीसीमध्ये ऑक्सिजन तयार होत आहे. बुटीबोरीतील आयनॉक्स एअर प्रॉडक्टमध्ये ९५ ते ९७ टन ऑक्सिजन तयार होते. याशिवाय इतर पाच ते सहा प्रकल्पातून २० ते २५ टन ऑक्सिजन तयार होत असल्याचे खजांची यांनी सांगितले.

तुटवडा नाही : खजांची
शहरात ऑक्सिजनचा तुटवडा नाही. शहराला पुरेल एवढ्या ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. एखादवेळी एकाच वेळेला खूप जास्त सिलिंडर भरण्यास आले तर अडचण निर्माण होते. परंतु त्यावरही रोटेशन पद्धतीने भरून देण्याचा पर्याय आहे, असेही खजांची म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy live : १४ चेंडू ५८ धावा... विराट कोहलीच्या फटकेबाजीने पुन्हा केला कल्ला... सलग दुसऱ्या शतकाला थोडक्यात हुकला

Pune International Film Festival : ‘पिफ’मध्ये ऑस्करच्या यादीतील नऊ चित्रपट पाहण्याची संधी

Japan Viral Video: जपानमध्ये चमत्कारच! रस्त्यावरून गाडी गेली की वाजतं संगीत, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

Organ Donation Accident : मृतदेहानेही दिलं जीवदान, अल्पवयीन चालकाच्या धडकेत झालेल्या मृत्यूनंतर अवयवदान; तिघांना जिवदान

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात; ख्रिसमसमुळे गुंतवणूकदार सावध; मात्र ओला इलेक्ट्रिकचे शेअर चर्चेत

SCROLL FOR NEXT