Cryptocurrency sakal
नागपूर

नागपूर : क्रिप्टो करन्सीच्या नावावर साडेचार कोटींचा गंडा

व्यावसायिकांची फसवणूक; ५ जणांवर गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : क्रिप्टो करन्सीच्या (Cryptocurrency) नावावर व्यावसायिकांची ४ कोटी ६८ लाख ७० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याची घटना सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. तक्रारीवरून पोलिसांनी ५ जणांवर गुन्हे नोंदविले. मो. हबीब मो. हनीफ (३९) रा. गुलशन ए अरफान कॉलनी कर्नाटक, मोहम्मद अब्बास मो. युसुफ (३४) रा. अहमदगढ पंजाब, मो. बेगम जुनैदी (२७), अहमद शेख (२७) आणि बुरहान शेख (२६) तिन्ही रा. सेंटर पॉईंट हॉटेल अशी आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी कॉरबीट क्वॉईन फर्मचे संचालक आणि पदाधिकारी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मोठ्या हॉटेल्समध्ये मार्च २०२१ मध्ये आरोपींनी संमेलन आयोजित केले होते. यातून लोकांना क्रिप्टो करंसीमध्ये पैसे गुंतवून बक्कळ नफा कमाविण्याचे आमिष दिले. लोंडे यांच्यासह ७ लोकांनी आरोपींच्या म्हणण्यावर ६ कोटी ५८ लाख रुपये गुंतविले. आरोपींनी विश्वास संपादन करण्यासाठी गुंतवणूकदारांना काही महिन्यांपर्यंत पैसेही परत केले.

जवळपास १ कोटी ८९ लाख ६० हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर गुंतवणूकदारांना व्याजाच्या नावावर नफा मिळणे बंद झाले. गुंतवणूकदारांनी पैशांसाठी संपर्क केला असता टाळाटाळ करू लागले आणि काही दिवसांनी सर्वांचे फोन बंद झाले. चौकशीत अशाच प्रकारे इतर राज्यातील लोकांचीही फसवणूक करण्यात आल्याची माहिती गुंतवणूकदारांना मिळाली. देशभर यांचे नेटवर्क असल्याची माहिती पुढे येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : नीटची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT