Culprit of a crime end his life by jumping in front of train in nagpur
Culprit of a crime end his life by jumping in front of train in nagpur  
नागपूर

समाजमन सुन्न! नागपुरातील आजी - नातू हत्याकांड घटनेतील मारेकऱ्याची  रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

योगेश बरवड

नागपूर ः प्रेमभंग व विरह असाह्य झाल्याने अल्पवयीन प्रियकराने प्रेयसीची आजी व लहान भावाची गुरुवारी (ता. १०) चाकूने भोसकून हत्या केली. त्याच दिवशी उशिरा रात्री स्वतःही  रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने मित्रांशी अखेरचा संवाद साधत आत्महत्या करायला जात असल्याची पूर्वकल्पना दिली असल्याची माहिती पुढे आली आहे. केवळ १७ वर्षांच्या तरुणाने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे उपराजधानीतील समाजमन सुन्न झाले आहे. 

लक्ष्मीबाई ऊर्फ प्रमिला मारोती धुर्वे (७०) आणि यश मोहन धुर्वे (१०) दोन्ही रा. हजारीपहाड अशी खून झालेल्या आजी-नातवांची नावे आहेत. दोघांचा खून करणारा मोईन केवळ १७ वर्षांचा असून मोमीनपुऱ्यातील रहिवासी आहे. दुहेरी हत्याकांडाची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. तिकडे दोघांची हत्या करूनही त्याच्या मनातील राग शांत होत नव्हता. जिवंत राहुनही उपयोग नाही. जिच्यासाठी हा संपूर्ण खटाटोप केला तिही आता आपला स्वीकार करणार नाही या विचाराने मोईन बैचैन झाला होता. क्षणिक रागातून त्याच्या हातून खुनासारखी भयंकर घटना घडली होती. 

घटनेनंतर तो भटकतच राहिला. राग आणि संतापाची जागा आता पश्चात्तापाने घेतली. अशा प्रसंगात त्याचा कुणाचाही संपर्क झाला नाही आणि त्याच्या मनात आत्महत्येचा विचार पक्का झाला. त्याच्या मनावर निराशेने अधिराज्य केले. कुठलाच मार्ग दिसत नसल्याने मोईन मानकापूर हद्दीतून जाणाऱ्या कोलकाता रेल्वे लाईनकडे गेला. सोबत केवळ मोबाईल होता. तेथून त्याने जिवलग मित्राला फोन केला. सर्वकाही संपले आहे, आत्महत्या करीत असल्याचे सांगून फोन कट केला. त्यानंतर धडधडत जाणाऱ्या रेल्वेखाली उडी घेतली. 

मध्यरात्रीनंतर नागपूरच्या दिशेने येत असलेल्या रेल्वेच्या पायलटला रुळानजीक मृतदेह पडून असल्याचे दिसले. त्याने रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. तिथून मानकापूर पोलिसांना सूचना देण्यात आली. माहिती मिळताच मानकापूर पोलीस घटनास्थळाकडे निघाले. मोईनच्या मित्रांनी तपासासाठी आलेल्या पोलिसांना तो आत्महत्या करणार असल्याची माहिती दिली. यावरून त्यांनीही रुळाच्या दिशेने धाव घेतली. घटनास्थळावरून त्याचा छिन्नविच्छिन्न मृतदेह ताब्यात घेतला.

मृत यशचे वडील मोहन धुर्वे पेंटर आहेत. मुलीची वर्षभरापूर्वी नोव्हेंबर महिन्यात इंस्टाग्रामवरून १७ वर्षीय तरुणाशी इंस्टाग्रामवरून ओळख झाली. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मोईनने तिच्यासोबत फोनवरून मैत्री केली. त्यानंतर धुर्वेच्या घरी जाऊ लागला. वडिलांनी दोघांची समजूत काढली पण त्यांच्यावर परिणाम होत नसल्याने अखेर मुलीला मामाकडे पाठवून देण्यात आले. दोघांची भेट होत नसल्याने मोईन कमालीचा व्यथित झाला होता. मोठा चाकू घेऊन तो धुर्वे यांच्या घरी आला. त्याने खुर्चीवर बसलेल्या आजीच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. त्याचवेळी यश शौचावरून परत आला. आजीला रक्ताच्या थारोळ्यात बघताच तो किंचाळला आणि पळून जाऊ लागला. मोईनने त्याला वाटेत पकडून त्याचीही हत्या केली.

कुटुंबीय वाटच बघत राहिले

मोईनच्या वडिलांचा ‘फेब्रिकेशन’चा व्यवसाय आहे. त्याला एक लहान बहीण आहे. गुरुवारी रात्री बराच उशीर होऊनही तो घरी न परतल्याने चिंताग्रस्त वडिलांनी त्याला फोन केला. तातडीने घरी येण्याचे फरमान सोडले. लवकरच घरी येण्याची ग्वाही देऊन त्याने फोन बंद केला. त्यानंतरही तो शहरात वेगवेगळ्या ठिकाणी भटकत राहिला. तिकडे कुटुंबीय चिंतेत होते. मात्र.त्यांच्या कानावर मुलाच्या आत्महत्येचीच बातमी आली. अविचारामुळे दोघांचा जीव घेणाऱ्या मोईनने स्वतःलाही संपवले.

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT