admission
admission 
नागपूर

यंदा वाढणार अकरावी प्रवेशाचा कट ऑफ! वाचा नेमके काय

मंगेश गोमासे

नागपूर : दहावीच्या निकालात यंदा २६ टक्क्यांनी वाढ झाली. त्याचा फायदा यावर्षी अकरावी प्रवेशात होण्याची शक्यता आहे. निकालात वाढ झाल्याने यंदा प्रवेशाचा कट ऑफही वाढण्याची शक्यता आहे.

अकरावी प्रवेशादरम्यान नामवंत महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागत असतात. या महाविद्यालयात प्रवेशासाठी अधिकचे पैसे पालक मोजत असतात. गेल्या वर्षी दहावीच्या निकालात १८ टक्क्‍यांनी घट झाली. तसेच ९० टक्‍क्‍यांच्यावर उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही घटली. निकालात झालेल्या पडझडीमुळे अनेक विद्यार्थ्यांची टक्केवारी घटल्याचे चित्र होते.

याचा परिणाम कट ऑफवर दिसून आला. त्यामुळे शिवाजी विज्ञान महाविद्यालयात द्विलक्षी अभ्यासक्रमातील ५० अनुदानित तुकडीसाठी ९७ टक्‍क्‍यांपर्यत कट ऑफ आला. याच अभ्यासक्रमात डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा कट ऑफ ९७.६ टक्‍क्‍यांवर, कॉम्प्युटर सायन्समध्ये महाविद्यालयाचा कट ऑफ ९६.६ टक्‍क्‍यांवर आला.

शिवाजी विज्ञान महाविद्यालयात विज्ञान शाखेत खुल्या गटासाठी ४३९ गुणावर तर अनुसूचित जाती (४१६), जमाती (२९६), इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी (४२४) इतका होता. आंबेडकर महाविद्यालयात खुल्या गटासाठी (४०५), अनुसूचित जाती (३८७), इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी (३९६) इतका होता. कला शाखेत हिस्लॉप महाविद्यालयात (३६१) इतका होता तर एलएडी महाविद्यालयात खुल्या गटासाठी (३५०), अनुसूचित जाती (२३६), जमाती (१८७), तर इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी (१८४) इतका होता. वाणिज्य शाखेत जी.एस. कॉमर्स महाविद्यालयाचा इंग्रजी वाणिज्यचा कट ऑफ (३५७) इतका होता.

मात्र, यावर्षी निकालात २६ टक्क्यांची वाढ झालेली आहे. त्यामुळे द्विलक्षीसह विज्ञान, वाणिज्य, कला शाखेच्या प्रवेशाचा कट ऑफ या महाविद्यालयात वाढण्याची शक्यता आहे. प्रवेशादरम्यान हे चित्र बघायला मिळेल.

असे आहेत गेल्या वर्षीचे कट ऑफ (अनुदानित तुकडी)

अभ्यासक्र      शिवाजी विज्ञान महाविद्यालय                        डॉ. आंबेडकरमहाविद्यालय

इलेक्‍ट्रानिक्‍स           ९७ टक्के                                                   ९७.६
फिशरिज               ९७ टक्के                                                    ९७.६ टक्के
कॉम्प्युटर सायन्स  ९७.००                                                      ९६.६ टक्के

विज्ञान - ६७.५३
वाणिज्य - (जी.एस. कॉमर्स - ५४.९२
कला - हिस्लॉप - ५५.५३, एलएडी महाविद्यालय - ५३.८४

कट ऑफ वाढणार
निकालात वाढ झाल्याने निश्चितच यावर्षी कट ऑफ वाढणार आहे. त्यामुळे महाविद्यालयात गुणवत्ता यादीमध्ये चुरस दिसून येईल.
डॉ. महेंद्र ढोरे
प्राचार्य, शिवाजी विज्ञान महाविद्यालय.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

SCROLL FOR NEXT