Cyber-Crime 
नागपूर

ऑनलाईन शॉपिंग करताय? सावधान, चोरटे घालताहेत गंडा

अनिल कांबळे

नागपूर : लॉकडाऊन असल्यामुळे घरबसल्या ऑनलाईन शॉपिंग किंवा फूड्‌स डिलीव्हरी करण्यावर नागरिकांचा भर आहे. त्यामुळे अनेकांनी मोबाईलमध्ये पेमेंट ऍप्स डाऊनलोड केले आहेत. सायबर गुन्हेगारांनी यांचाच लाभ उठवित ऑनलाईन गंडा घालणे सुरू केले आहे. गेल्या चार महिन्यांत ऑनलाईन फसवणुकींच्या गुन्ह्यांमध्ये अचानक वाढ झाल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेमेंट ऍप्स वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. इंटरनेटवरून घरबसल्या वस्तू बोलावणे, ड्रेस, घरगुती सामान आणि फूड मागणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यासोबतच कुणाला पैसे पाठवणे किंवा बिल चुकते करणे, मोबाईल बिल, वीज बिल, मोबाईल रिचार्ज यासह किराणा दुकानातील सामान विकत घेण्यापर्यंत आता मोबाईलवरून पेमेंट केल्या जात आहे. स्मार्टफोनमध्ये पेटीएम, गुगल पे आणि फोन पे यासह अन्य ऍप्स डाऊनलोड केल्यानंतर डिजीटल व्यवहार सोपे झाले आहे. मात्र, याच संधीचा लाभ सायबर गुन्हेगारांनी उचलला आहे. गेल्या चार महिन्यात ऑनलाईन फसवणूकीत वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार अनेकांच्या खात्यातून लाखो रूपये परस्पर काढून घेत आहेत. "बॅंकेतून बोलतो, पेटीएमची केवायसी करून देतो, एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे असे अनेक फंडे सायबर गुन्हेगार वापरून नागरिकांना जाळ्यात ओढतात. महागडे स्मार्ट फोन वापरराणाऱ्यांना सायबर गुन्हेगार गंडवित आहेत. फसगत होणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षितांची संख्या मोठी आहे. पोलिसांनी फेक मॅसेज किंवा बॅंकेतून बोलत असल्याची बतावणी करणाऱ्यांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन वारंवार केल्यानंतरही उच्चशिक्षित पुरुष व महिलांची ऑनलाईन फसवणूक होत आहे.
ओएलक्‍सवरूनही गंडा
ओएलएक्‍स वेबसाइटवर सेकंड हॅंड चारचाकी गाड्या, बुलेट्‌स, मोटारसायकल, मोबाइल फोन आणि अन्य गॅझेट्‌स कमी किंमतीत विक्रीला उपलब्ध असल्याची जाहिरात आधी टाकली जाते. "गूगल पे'चा क्‍यूआर कोड स्कॅन करून पैसे पाठवा', असे सांगितले जाते. त्यानंतर संबंधित ग्राहकाच्या व्हॉट्‌सऍप नंबरवर डीलिव्हरीचे अपडेट पाठवले जातात. प्रत्येकवेळी पैशांची मागणी केली जाते. मात्र, मागवलेली वस्तू काही ग्राहकांना मिळत नाही.

सविस्तर वाचा - तुम्ही रोगयुक्‍त फळे तर खात नाही ना?
व्यवहार करताना काळजी घ्या
लॉटरी जिंकली, बॅंकेतून बोलतोय, पेटीएम केवायसी आणि एटीएम ब्लॉक झाले, यासंदर्भात कुणी फोन केल्यास त्याच्यावर विश्‍वास ठेवू नये. तो सायबर गुन्हेगार असू शकतो. ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्यावी. फसवणूक झाल्यास त्वरित सायबर सेलमध्ये तक्रार करावी.
अश्‍विनी जगताप, पोलिस निरीक्षक, सायबर सेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs LSG Live: अजिंक्य रहाणेच्या मेहनतीवर सहकाऱ्यांनी फिरवले पाणी; लखनौला दिली पुनरागमनाची संधी, कोलकातात मोठा ड्रामा

Deglur NCP leadership change: देगलूर राष्ट्रवादीत खांदेपालट; शिवाजीराव कनकंटे तालुकाध्यक्ष, मंगल आलुरकर व नारायण पाटील यांना जिल्हा उपाध्यक्षपदाची बढती

High Court on TET : अल्पसंख्याक शाळांमध्ये टीईटी बंधनकारक नाही; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, शिक्षकांना दिलासा

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

KKR vs LSG Live: चर्चा तर होणारच... अजिंक्य रहाणेचा अतरंगी Six! रिषभ पंतच्या मास्टरस्ट्रोकने LSG ला विकेट मिळवून दिली Video Viral

SCROLL FOR NEXT